नागपूर,
R. S. Mundley English School समर्थ नगर येथील आर. एस. मुंडले इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता सहावीचा विद्यार्थी अथर्व जोशी याने डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा गौरव वाढवला आहे.
ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशनतर्फे आयोजित या प्रतिष्ठित स्पर्धेत अथर्वने तिसरी व चौथी फेरी यशस्वीरित्या पार करत रौप्य पदक पटकावले. त्याचा सन्मान १२ एप्रिल २०२६ रोजी मुंबई येथे झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात करण्यात आला.अथर्वने "कार्बन फूटप्रिंट" या महत्त्वपूर्ण पर्यावरणीय विषयावर सादर केलेले कृती संशोधन विशेष लक्षवेधी ठरले असून परीक्षकांनीही त्याचे कौतुक केले. R. S. Mundley English School या यशामागे मार्गदर्शक शिक्षिका मोनिका हरदास यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच मुख्याध्यापिका लखबीर कौर सुरी, पर्यवेक्षिका अमृता नगरकर व व्यवस्थापन मंडळाने अथर्वचे अभिनंदन केले.शिक्षक, विद्यार्थी व पालकांकडूनही अथर्ववर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, भविष्यात तो आणखी मोठी भरारी घेईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सौजन्य:प्रीती लांबे,संपर्क मित्र