तस्करांच्या तावडीतून 27 जनावरांची सुटका

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
31 लाखांचा मुद्देमाल जप्त
5 आरोपींविरूध्द गुन्हा दाखल

चंद्रपूर, 
Rescue of smuggled animals कत्तलीसाठी वाहनात कोंबून नेण्यात येत असलेल्या 27 जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तस्करांच्या तावडीतून सुटका केली असून, 31 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 5 आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार, 12 एप्रिल रोजी पडोली ते घुग्गुस मार्गावरील खुटाळा येथे करण्यात आली.
 
 
taskar
 
चंद्रपूर शहरात गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने पडोली ते घुग्गुस मार्गावरील खुटाळा येथे सापळा रचला. यावेळी ट्रक क्रमांक (एपी 07 टयू 3499) ला थांबवून झडती घेतली असता, त्यामध्ये 27 जनावरे आढळली. सर्व जनावरे तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेत होते. या प्रकरणी एकाला अटक तर 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये 22 वर्षीय दानिश अब्दुल हमीद कुरेशी (रा. व्याहाड खुर्द, सावली), तेलंगणा राज्यातील समीर उर्फ सोहेल, गडचांदुरातील सादिक कुरेशी, राजुर्‍यातील समीर खान मूसावीर खान, कागजनगरमधील अजीम उर्फ अजु शेख यांचा समावेश आहे. या कारवाईत 27 जनावरे, ट्रक व चारचाकी वाहनासह पोलिसांनी एकूण 31 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. सुरक्षेच्या दृष्टीने सुटका केलेल्या 27 जनावरांना प्यार फाउंडेशनमध्ये जमा करण्यात आले.
 
 
 
Rescue of smuggled animals  आरोपींवर पडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करीत आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्‍वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलिस उप निरीक्षक विनोद भुरले व सुनील गौरकार, पोलिस कर्मचारी सुभाष गोहोकर, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार आदींनी केली.