नारी शक्ती वंदन अभियान १५-१६ एप्रिलला

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
नागपूर,
‘Salutation to Women’s Power’ भारतीय जनता पक्षातर्फे देशव्यापी ‘नारी शक्ती वंदन’ अभियानाचे आयोजन १५ व १६ एप्रिल रोजी करण्यात आले असून, नागपूर शहरात या अभियानाची सुरुवात १३ एप्रिलपासून होणार आहे.‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ हा लोकसभा, राज्य विधानसभा आणि दिल्ली विधानसभेत महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण देणारा ऐतिहासिक घटनादुरुस्ती कायदा असून, सप्टेंबर २०२३ मध्ये संसदेने त्यास मंजुरी दिली आहे. या कायद्यामुळे महिलांचा राजकारणातील सहभाग आणि प्रतिनिधित्व वाढणार असल्याचे भाजपाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
 
ladi
 
 
महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारतर्फे विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. उज्ज्वला योजना, जल जीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान, जनधन योजना, मुद्रा योजना आदी उपक्रमांमुळे महिलांच्या जीवनमानात सकारात्मक बदल झाल्याचा दावा करण्यात आला . ‘Salutation to Women’s Power’ तसेच पंचायतराज संस्थांमध्ये सुमारे ४६ टक्के महिला प्रतिनिधित्व असून, ग्रामीण भागात महिलांनी प्रभावी नेतृत्व सिद्ध केले आहे. महिलांचा वाढता मतदानाचा टक्का आणि विविध क्षेत्रातील सहभाग लक्षात घेता, राजकीय निर्णयप्रक्रियेतही त्यांचा अधिक सहभाग आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.या अभियानामुळे महिलांचे प्रतिनिधित्व वाढून शिक्षण, आरोग्य, पोषण, सुरक्षा व स्वच्छता यांसारख्या विषयांना अधिक प्राधान्य मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.पत्रकार परिषदेत महापौर नीता ठाकरे, प्रदेश सरचिटणीस अर्चना डेहणकर, अश्विनी जिचकार, शिवानी दानी वखरे, प्रगती पाटील, दिव्या धुरडे, सारिका नांदुरकर, निधी तेलगोटे, रुतिका मसराम, पवन तिवारी व कल्पना नळस्कर उपस्थित होते.
सौजन्य:देवराव प्रधान,संपर्क मित्र