ब्रेट ली-आशाताईंचा अनोखा संगम

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली,
brett-lee-asha-bhosale : भारतीय संगीतविश्वाला मोठा धक्का बसला असून दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 
 
brett-lee-asha-bhosale 
 
 
आशाताईंच्या कारकिर्दीतील अनेक अनोख्या आठवणींपैकी एक म्हणजे त्यांचा क्रिकेटविश्वाशी असलेला खास संबंध. विशेष म्हणजे, त्यांनी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली याच्यासोबत एक लोकप्रिय हिंदी गाणेही गायले होते.
 
ब्रेट लीसोबतचं गाणं ठरलं खास
 
2006 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान हे गाणे रेकॉर्ड करण्यात आले होते. “यु आर द वन फॉर मी” हे गाणे ब्रेट लीने स्वतः लिहिले असून, त्याने ते हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये गायले.
 
हे गाणे एका ऑस्ट्रेलियन युवक आणि भारतीय मुलीच्या प्रेमकथेवर आधारित होते. विशेष म्हणजे, हे गाणे अवघ्या काही तासांत रेकॉर्ड झाले होते आणि त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
 
क्रिकेट आणि संगीत यांचा अनोखा संगम
 
ब्रेट ली हा मैदानावर 1000 हून अधिक विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याच्या गोलंदाजीइतकाच त्याचा संगीतप्रेमी स्वभावही चाहत्यांना भावला. आशा भोसले आणि ब्रेट ली यांचा हा अनोखा संगम क्रिकेट आणि संगीत प्रेमींसाठी आजही खास आठवण ठरतो.
 
सचिन तेंडुलकरशीही विशेष नाते
 
आशाताईंचे भारतीय क्रिकेटमधील महान खेळाडू सचिन तेंडुलकर यांच्याशीही जिव्हाळ्याचे संबंध होते. त्या त्यांना आपल्या मुलासारखे मानत आणि त्यांच्या खेळाचे नेहमी कौतुक करत असत. एकूणच, आशा भोसले यांनी केवळ संगीत क्षेत्रातच नव्हे, तर क्रिकेटसारख्या क्षेत्राशीही आपले नाते जोडत एक वेगळी ओळख निर्माण केली होती.