वन विभाग सतर्क : नागरिकांत भीतीचे वातावरण
वणी,
तालुक्यातील Tiger in Rasa-Borda Shivara रासा-बोर्डा शिवारात वाघाचा वावर शिवारात वाघाचा वावर आढळून आल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील विविध भागांत यापूर्वी वाघांच्या हल्ल्यांच्या घटना घडलेल्या पार्श्वभूमीवर आता वणी परिसरातही वाघाच्या हालचाली दिसू लागल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी रासा शिवारात शेतात काम करणार्या काही शेतकर्यांना वाघ दिसल्याची माहिती समोर आली. या आधारे वन पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता वाघाच्या पावलांचे ठसे (पगमार्क) आढळून आले. यावरून परिसरात वाघाचा वावर असल्याचे स्पष्ट झाले.
(संग्रहित छयाचित्र )
या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने उपाययोजना करत रासा, बोर्डा तसेच लगतच्या जंगल परिसरात एकूण सात ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. या कॅमेर्यांद्वारे वाघाच्या हालचालींवर २४ तास नजर जात आहे. तसेच वनरक्षकांकडून दिवसरात्र गस्त वाढविण्यात आली असून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात आहे. वन विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार कुर्ली व रासा शिवारात दोन वाघांचा वावर असण्याची शक्यता आहे. अद्याप ट्रॅप कॅमेर्यांमध्ये स्पष्ट चित्र कैद झालेले नसून शोधमोहीम अधिक तीव‘ करण्यात आली आहे. यासाठी अतिरिक्त मनुष्यबळही तैनात करण्यात आले वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत.
Tiger in Rasa-Borda Shivara दरम्यान, वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जंगलात जाणे टाळावे, सकाळ-संध्याकाळ एकटे फिरू नये, शेतात काम करताना समूहाने राहावे तसेच लहान मुलांना एकटे सोडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. संशयास्पद हालचाल दिसल्यास तत्काळ वन विभागाला कळविण्याचेही सांगण्यात आले आहे. वन विभागाच्या सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणात असली तरी वाघाचा अचूक मागोवा लागेपर्यंत नागरिकांनी दक्षता बाळगणे आवश्यक असल्याचे वन अधिकार्यांनी सांगितले.