कार्यशाळेचे यशस्वी आयोजन
यवतमाळ,
येथील Vasantrao Naik Government Medical College वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शल्यचिकित्सा, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक संघटना आणि रोटरी क्लबच्या विद्यमाने ‘स्तनांचा कॅन्सर, शस्त्रकि‘या आणि पुनर्रचना’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत शल्यचिकित्सा विभाग प्रमुख विजय पोटे यांनी त्यांच्या ३५ वर्षांच्या रुग्णांवरील शस्त्रकि‘या व स्तनांच्या पुनर्रचनेचे वेगवेगळे प्रकार, तसेच इटलीतील सर्वात मोठ्या मिलान या शहरात दिलेल्या लेक्चरचे सादरीकरण केले. त्यानंतर केंद्र शासनाच्या आरोग्य योजना समन्वयक डॉ. विशाखा भारती यांनी स्तनांच्या वेगवेगळ्या ३ ते ७ मिलिमिटरपर्यंत असलेल्या गाठींच्या निदानाच्या यंत्राच्या उपयोगितेची माहिती दिली.
स्तनामध्ये सामान्यतः गाठ लागण्यासाठी ती कमीत कमी १ सेमीची व्हावी लागते. त्याच्यापेक्षा लहान गाठ हाताला लागत नाही. या यंत्राद्वारे त्यापेक्षा लहान गाठीचीसुद्धा माहिती मिळू शकते व त्यावर वेळेत उपचार करून पहिल्या व दुसर्या स्टेज रुग्णांवर लगेच उपचार करून त्यांना कॅन्सरपासून मुक्त केले जाऊ शकते. आजकाल पहिल्या व दुसर्या स्टेजच्या स्तनाच्या कॅन्सरचे वेळेत उपचार केले तर ते रुग्ण २० वर्षे जगतात असे शास्त्रज्ञांच्या शोधातून सिद्ध झाले आहे. आणि जर ते वीस वर्षे जगले तर त्यातले बरेच रुग्ण त्याच्याही वर म्हणजे पूर्ण आयुष्य जगू शकतात. त्यामुळे स्तनाच्या कॅन्सरच्या रुग्णाचा वेळेत उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे.
Vasantrao Naik Government Medical College या कार्यशाळेत येथील ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ. भुयार यांनी सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेत मोलाचे मार्गदर्शन केले. त्या भारतीय स्त्रीरोग संघटनेच्या स्तनांच्या गाठी आजाराच्या अध्यक्ष आहेत. त्यांना देशभर या आजाराच्या मार्गदर्शनासाठी बोलावले जाते. त्यांच्या या जनजागृती कार्याबद्दल त्यांचा डॉ. किरण भारती व मंजूषा पोटे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उदघाटन सोहळ्याच्या सुरुवातीला व सरस्वतीपूजनानंतर डॉ. सुरेंद्र भुयार यांनी सरस्वती स्तवन गायले. त्यानंतर प्रभारी अधिष्ठाता डॉ. रवींद्र राठोड यांनी यंत्राचे व कार्यशाळेचे महत्व विशद केले.
या कार्यक‘मात डॉ. विजय पोटे यांनी पालकमंत्री संजय राठोड व जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जिल्हा योजनेतून दिलेल्या निधीमुळे व तत्कालीन अधिष्ठाता डॉ. गिरीश जतकर यांच्या कार्यतत्परतेमुळे नूतनीकरण वातानुकूलित सभागृहात हा सोहळा पार पडला. या कार्यशाळेत ६५ रुग्णांच्या स्तनांची तपासणी यंत्राने झाली. त्यातून १७ रुग्णांमध्ये स्तनांच्या गाठींचे निदान झाले. त्यांना पुढील उपचारांकरिता मागदर्शन करण्यात आले.
Vasantrao Naik Government Medical College याप्रसंगी या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार यांचा डॉ. विजय पोटे यांनी विशेष सत्कार केला. डॉ. भुयार यांनी कार्यशाळेचे सूत्रसंचालन केले. सूरज किरपाल यांना डॉ. पोटे यांनी ‘मॅन ऑफ द मॅच’ घोषित केले. या प्रसंगी रोटरी सदस्य जलालुद्दीन गिलानी यांचा त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. या कार्यक‘माला रोटरी अध्यक्ष डॉ. आशिष गवरशेट्टीवार, पत्रकार दिनेश व आरती गंधे यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर व इतर गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती.