साईबाबा नगर, दिघोरी येथे विराट हिंदू संमेलन उत्साहात

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Saibaba Nagar दिघोरी येथील साईबाबा नगरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘पंच परिवर्तन’ उपक्रमांतर्गत सकल हिंदू समाजाच्या मार्गदर्शनाखाली विराट हिंदू संमेलन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भारतमाता पूजनाने झाली. यावेळी परमपूज्य भगीरथी महाराज (विश्व हिंदू परिषद, केंद्रीय मार्गदर्शन मंडळ, गुरुकृपा आश्रम, सर्पिधाम, बेसा-बेलतरोडी), प्रमुख वक्ते अटलबिहारी पांडेय (विदर्भ प्रांत प्रमुख), साईबाबा मंदिराचे अध्यक्ष सुरेशजी सवाई तसेच अभिनंदन महाविद्यालयाचे प्राचार्य अणे राठोड सर उपस्थित होते.
 
 
Saibaba Nagar
 
कार्यक्रमादरम्यान भगीरथी महाराज यांच्या हस्ते गोमाता पूजनही करण्यात आले. प्रास्ताविक सुरेशजी सवाई यांनी केले, तर नागेशजी टेंभेकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. भगीरथी महाराजांचे स्वागत सुधाकरराव इंगोले यांनी, अटलबिहारी पांडेय यांचे स्वागत मनोज राघोर्ते यांनी, सुरेशजी सवाई यांचे स्वागत चंदन यादव यांनी आणि प्राचार्य अणे राठोड यांचे स्वागत चंद्रशेखर जौजळकर यांनी केले. Saibaba Nagar आपल्या मार्गदर्शनपर भाषणात भगीरथी महाराज यांनी हिंदू समाजातील एकता, सांस्कृतिक जतन आणि सामाजिक समरसतेचे महत्त्व अधोरेखित केले. तर अटलबिहारी पांडेय यांनी आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेवर भाष्य करत युवकांनी समाजहितासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
 
 
कार्यक्रमात हनुमान चालीसा व भारतमातेची आरतीही सादर करण्यात आली. शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. Saibaba Nagar त्यानंतर मंदिर परिसरात आयोजित आनंद मेळाव्यात उपस्थितांनी विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. या संमेलनाला परिसरातील गणमान्य नागरिक, महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिव गजानन मंडळ, संत गजानन महाराज माऊली मंडळ, ओम श्री साई सेवाराम मंडळ उत्सव समिती तसेच ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.
सौजन्य: सतीश देशपांडे, संपर्क मित्र