विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
दारव्हा, 
Youth dies due to electric shock घराच्या बांधकामादरम्यान विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील मुंडळ (हादगाव) येथे शनिवार, ११ एप्रिल रोजी रात्री ८.३० च्या सुमारास घडली. युग झोलेश धादोड (वय १७, मुंडळ हादगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. त्याने नुकतीच शिवाजी सायन्स कॉलेज येथून ११ वीची परीक्षा दिली होती.
 
 
kyug
 
Youth dies due to electric shock  महाविद्यालयात हुशार, प्रेमळ, प्रामाणिक विद्यार्थी म्हणून त्याचा नावलौकिक असून त्याचे वडील प्रगतीशील शेतकरी आहेत. घराचे बांधकाम सुरू असताना शनिवार, ११ एप्रिलला रात्री त्याला अचानक विजेचा जबर धक्का बसला. त्याला वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतरही त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेने गावात हळहळ असून तरुण गेल्याने धादोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.