अयोध्येतील श्रीराम मंदिराच्यासर्व उपमंदिरांमध्ये दर्शन सुरू

    दिनांक :13-Apr-2026
Total Views |
अयोध्या
Shri Ram temple Ayodhya अयोध्येत आता केवळ रामललाल नव्हे तर मंदिर परिससरातील सर्व १८ मंदिरांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. ही नवीन व्यवस्था सोमवार १३ एप्रिलपासून लागू झाली आहे.
 
 ayodhya 
Shri Ram temple Ayodhya श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने या नवीन व्यवस्थेची जय्यत तयारी केली. सुरुवातीचे तीन महिने ही व्यवस्था प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार आहे. या पहिल्या टप्प्यात दररोज १५०० भाविकांना ऑनलाईन पासद्वारे या सर्व मंदिरांचे दर्शन घेता येईल. या विशेष पासचे बुकिंग मागील शुक्रवारपासूनच सुरू झाले आहे.
Shri Ram temple Ayodhya राम मंदिर निर्माण प्रभारी गोपाल राव यांनी सांगितले की, या १५०० पासचे तीन भाग करण्यात आले आहेत. यामध्ये ५००  पास सुगम दर्शनासाठी, ५०० पास विशिष्ट दर्शनासाठी तर ५०० पास सामान्य दर्शनासाठी असतील. हे सर्व पा आधी येणाèयास प्राधान्य या तत्वावर ऑनलाईन उपलब्ध करून दिले जातील.
Shri Ram temple Ayodhya या पासचा वापर करून भाविकांना आधी रामललांचे दर्शन होईल. त्यानंतर दक्षिण बाजूच्या पायèयांवरून त्यांना राम परिवाराच्या दर्शनासाठी पाठण्यिात येईल. तिथून भाविक शेषावतार मंदिर, सप्त मंडपम आणि कुबेर नवरत्न टिला या ठिकाणांचे दर्शन घेऊ शकतील. दर्शन पूर्ण झाल्यावर भाविक परकोटा परिसरातून बाहेर येऊन लॉकर रूममधून आपले सामान घेऊन बाहेर पडू शकतील.
Shri Ram temple Ayodhya भवन निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी सांगितले की, कुबेर नवरत्न टिला येथील माती परीक्षण केले असता तिथे एका वेळी ठराविक वजनच असणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळेच सुरक्षा आणि संरचनेचा विचार करून एका वेळी १५०० भाविकांनाच प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Shri Ram temple Ayodhya या दर्शनासाठी काही नियम देखील कडक करण्यात आले आहेत. एका कुटुंबातील जास्तीत जास्त पाच व्यक्तींनाच एकत्र पास मिळू शकणार आहे. ऑनलाईन अर्जासाठी अर्जदाराचा फोटो आणि प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. भाविकांनी दर्शनाला जाताना आपले मूळ आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे. हे पास सकाळी ७ ते रात्री ९ च्या दरम्यान दोन-दोन तासांच्या स्लॉटमध्ये उपलब्ध असतील.