आरोग्यम धन संपदा, शत्रु बुद्धी विनाशाय

पद्मश्री डॉ.विलास डांगरे यांचे प्रतिपादन

    दिनांक :13-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Dr Vilas Dangre मानवी प्रकृतीनुसार प्रत्येक ऋतु व्यक्तीला हवाहवासा वाटतो. पण या आवडत्या ऋतुतही आपल्याला काही ना काहीतरी त्रास होतच असतो. त्यामुळेच म्हणतात, ‘आरोग्यम धन संपदा, शत्रु बुद्धी दिप: ज्योती नमोस्तुते...!’ या संस्कृत उक्तीप्रमाणे स्वत:च्या आरोग्याची काळजी आपण स्वत:च घेणे क्रमप्राप्त असल्याचे स्पष्ट प्रतिपादन पद्मश्री डॉ.विलास डांगरे यांनी केले.
 

Padma Shri Dr Vilas Dangre 
होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशनच्या वतीने होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युएल हनिमन जयंती निमित्त आयोजित यांना जीवन गौरव पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अभिजीत वंजारी स्मिता ढोबळे, डॉ. रुपश्री तांबे,डॉ. दिलीप खडोदे, डॉ संजय तांबे,डॉ.अजय काळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.विलास डांगरे यांच्या हस्ते ज्येष्ठ होमिओपॅथी चिकित्सकांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यात डॉ. विलास सुरकर, डॉ. प्रशांत सम्मनवार , डॉ. माधुरी तांभेकर, डॉ. संजीवनी येलने, डॉ. राजेश गरीबे, डॉ. रमाकांत कापरे शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
डॉ.विलास डांगरे पुढे म्हणाले, Dr Vilas Dangre  आरोग्य चांगले असेल तर आयुष्यातील सुखांचा आपल्याला आनंदाने उपभोग घेता येतो.हिवाळ्यात सर्दी, उन्हाळ्यात उष्माघात तर पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया या आजारांचा त्रास होत असतो.आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी प्रत्येकांनी योग्य आहार, व्यायाम, योगासने सकारात्मक विचार कायम राखवा, यामुळे निरोगी आयुष्य जगण्यास मदत होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अजय काळे व डॉ. प्रज्ञा मेंढे , डॉ. स्वरा चौधरी, डॉ. योगेश डोये आदींनी परिश्रम घेतले.