नागपूर,
Aasman Foundation आसमान फाउंडेशन, नागपूर यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त वर्धा येथील विविध निवासी संस्थांमध्ये अग्निशमन यंत्रांचे वाटप करण्यात आले. यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अंध विद्यालय, शारदा मूकबधिर विद्यालय, उषःकाल मुलींचे बालगृह आणि श्रीछाया मुलांचे बालगृह यांचा समावेश होता. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे हा होता.
कार्यक्रमादरम्यान शारदा कला व सांस्कृतिक मंडळ वर्धा यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. Aasman Foundation यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी मधुर स्वरात स्वागतगीत सादर करून कार्यक्रमाला सुरुवात केली. आसमान फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. रवि गि-हे यांनी निवासी दिव्यांग संस्थांमध्ये अग्निशमन यंत्रांची अत्यंत आवश्यकता असल्याचे सांगत अशा सामाजिक उपक्रमांसाठी फाउंडेशन सदैव तत्पर असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. लोखंडे यांनी केले. शारदा कला व सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्ष डॉ. उषा फाले, शाखाप्रमुख आशिष खोडे, प्रकाश नरवरे, अर्चना बालमवार, सुवर्णा बारोकर, पंकज रंगारी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. Aasman Foundation यावेळी आसमान फाउंडेशनचे वर्धा शाखाप्रमुख श्याम चंद्रा, दिनेश टेकाडे, नंदकिशोर राजुरकर, नरेश जागोजी तसेच आसमान महिला क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षा मेघा गि-हे उपस्थित होत्या. कार्यक्रमास संबंधित सर्व शाळा व बालगृहातील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य: दिनेश टेकाडे, संपर्क मित्र