ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचा वर्धापन दिन साजरा

    दिनांक :13-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Consumer Vigilance Welfare Foundation ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचा तिसरा वर्धापन दिन शंकरनगर येथील साई सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी “दक्षता की राह” या ग्राहकाभिमुख पुस्तकाचे प्रकाशन डॉ. विलास डांगरे यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आले. या पुस्तकाच्या निर्मितीत संस्थापक संपादक नितीन सोळंके, लेखिका डॉ. रोशनी सिंह, संपादक रोशन सिंह आणि सजावटकार तरुण निर्बाण यांचे योगदान लाभले. कार्यक्रमात ग्राहक जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या “भाई आया रे गॅस सिलेंडर…” या बोधपर गीताचेही विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून पुणे येथील किशोर नृत्य निकेतन यांच्या वतीने लोकनृत्य सादर करण्यात आले.
 
Consumer Vigilance Welfare Foundation
 
सौजन्य: डॉ. प्रभुदास रामटेके, संपर्क मित्र