नवी दिल्ली,
app will need to be reined देशात डिजिटल वापर झपाट्याने वाढत असताना त्याच्याशी संबंधित काही गंभीर सामाजिक प्रश्नही समोर येत आहेत. मोबाईल आणि विविध ॲप्लिकेशन्सच्या वाढत्या वापरामुळे अनेक सुविधा सहज उपलब्ध झाल्या असल्या तरी या डिजिटल जगाची एक चिंताजनक बाजूही आता चर्चेत आली आहे. विवाहबाह्य संबंधांना प्रोत्साहन देत असल्याच्या आरोपामुळे डेन किंवा अप्पलायका विरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर वापरकर्ते जोडले गेले असल्याचे समोर आले असून या ॲप्लिकेशन्समुळे वैवाहिक नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो, तसेच कौटुंबिक हिंसाचार आणि मानसिक अस्थैर्य वाढण्याची शक्यता असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दोन आठवड्यांच्या आत अहवाल द्या
या पार्श्वभूमीवर भारताच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची दखल घेत कारवाई सुरू केली आहे. एका स्वयंसेवी संस्थेने केलेल्या तक्रारीनंतर आयोगाने हे प्रकरण गंभीर मानत पुढील तपासासाठी पावले उचलली. आयोगाचे सदस्य प्रियांक कानूंगो यांनीही या संदर्भात भूमिका मांडत संबंधित अनुप्रयोग विवाहबाह्य संबंधांना चालना देतो, असा आरोप अधोरेखित केला. यानंतर आयोगाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला नोटीस पाठवत या अनुप्रयोगाची वैधता, त्याचे कार्य आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामांबाबत सविस्तर अहवाल मागवला आहे. दोन आठवड्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून महिलांच्या आणि मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही या प्रकरणाचा आढावा घेण्याचे सांगण्यात आले आहे.या संपूर्ण प्रकरणामुळे डिजिटल युगातील सामाजिक परिणामांबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून तंत्रज्ञानाच्या वापरासोबत जबाबदारीची जाणीव ठेवण्याची गरज अधोरेखित होत आहे.