शासकीय सन्मानात होणार आशा भोसलेंचा अंत्यसंस्कार

    दिनांक :13-Apr-2026
Total Views |
मुंबई.
Asha Bhosle भारतीय संगीतविश्वातील दिग्गज गायिका आशा भोसले यांचे १२ एप्रिल रोजी मुंबईत निधन झाले असून त्यांच्या जाण्याने देशभरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाचे कारण म्हणून वयोमानामुळे आलेल्या आजारांमुळे अनेक अवयव निकामी झाल्याची माहिती कुटुंबीय आणि डॉक्टरांकडून देण्यात आली. तर त्यांच्या नात जनाई भोसले यांनी समाजमाध्यमांवर सांगितले की, छातीचा संसर्ग आणि प्रचंड अशक्तपणामुळे त्यांना एक दिवस आधी ब्रीच कँडी रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले होते.
 
Asha Bhosle
 
त्यांच्या पार्थिवावर राष्ट्रध्वजाने सन्मान व्यक्त करण्यात आला असून त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. Asha Bhosle राज्याच्या वतीने त्यांना शासकीय सन्मानाने अखेरचा निरोप दिला जाणार आहे. आज दुपारी चार वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्या ठिकाणी हजारो चाहत्यांनी गर्दी केली आहे. सकाळी साडेदहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत लोअर परळ येथील कासा ग्रांडे इमारतीत त्यांचे अंतिम दर्शन ठेवण्यात आले होते. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रात एक मोठे युग संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.