आशाताई स्वत: गेल्या दादरच्या भाजी बाजारात

    दिनांक :13-Apr-2026
Total Views |
पराग मगर
नागपूर
ashatai सरसंघचालक डाॅ. माेहनजी भागवत यांना मुंबईतील घरी भाेजनाचे खास निमंत्रण आशा भाेसले यांनी दिले हाेते. त्यांच्यासाठी सर्व भाेजन मीच तयार करणार असे ठामपणे सांगत दादरच्या बाजारातून भाजी आणण्यासाठी आशाताई स्वतः गेल्या हाेत्या. प्रसिद्ध गायिका असल्या तरी त्या कशा कुटुंबवत्सल हाेत्या याची छानशी आठवण अमर कुळकर्णी यांनी आशाताईंच्या स्मरणार्थ सांगितली. आशा भाेसले यांनी महालातील संघ मुख्यालयात सरसंघचालकांची भेट घेतली तेव्हा, मुंबईला माझ्या घरी भाेजनाला या, असे आग्रहाचे निमंत्रण त्यांनी सरसंघचालकांना दिले हाेते.
 
 

आशाताई स्वत: गेल्या दादरच्या भाजी बाजारात 
 
 
सरसंघचालकांनीही हे निमंत्रण स्वीकारले आणि नक्कीचे येण्याचे कबूलही केले. 23 जानेवारी 2025 या दिवशी ते मुंबईतील परळ येथील आशाताईंच्या घरी भाेजनाला गेले. याविषयी अमर कुळकर्णी सांगतात, ही जबाबदारीदेखील माझ्यावर हाेती. या भेटीतही गप्पा रंगल्या. आपण केवळ आशाताईंना ऐकताे. परंतु घरी त्या सगळ्यांची कशी काळजी घेतात, हे मलाही प्रत्यक्ष अनुभवता आल्याचे त्यांनी सांगितले.
15 दिवसांपूर्वीच घेतले बाेलावून
सरसंघचालक डाॅ. माेहनजी भागवत भाेजनाला येणार असल्याने त्यांना काय आवडतं, ते कसे भाेजन घेतात हे जाणून घेण्यासाठी आशा भाेसले यांनी अमर कुळकर्णी यांना 15 दिवसांपूर्वी घरी बाेलावून घेतले हाेते. ते कुठल्या भाज्या खातात, काय पत्थे पाळतात हे सगळे अगदी बारकाईने त्यांनी नाेंदवून घेतले.
पूर्ण वेळ राहिल्या शेजारी उभ्या
आशाताई स्वतः दादरच्या बाजारात चेहरा लपवून गेल्या आणि स्वतः भाज्या आणून स्वयंपाक केला. सरसंघचालकांनी इच्छा व्यक्त केल्यानुसार त्यांनी भरीत-भाकरीचा बेत केला.ashatai एवढेच नव्हे तर त्यांचे भाेजन हाेईपर्यंत त्या शेजारी पूर्ण वेळ उभ्या राहिल्या.
ऐकविली भीमपलासी रागातील खास बंदिश
भाेजनानंतर गप्पांची मैफल रंगली असताना आशाताईंनी सरसंघचालकांच्या आवडत्या भीमपलासी रागातील बंदिश ऐकविली. ही बंदिश मी बèयाच दिवसांनी गात असल्याचे त्या म्हणाल्या हाेत्या. तसेच त्यांनी यावेळी गायिलेली ‘सलाेना सा सजन हैं’ ही गझल सर्वांना भावविभाेर करून गेल्याचे कुळकर्णी म्हणाले.