मुंबई,
Athiya Shetty's stupidity दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर देशभरात शोककळा पसरलेली असतानाच अभिनेत्री अथिया शेट्टी हिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे वाद निर्माण झाला आहे. आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहताना तिने केलेल्या एका चुकीमुळे ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.अथिया शेट्टी हिने समाजमाध्यमावर आशा भोसले यांच्यासाठी शोकसंदेश शेअर करत श्रद्धांजली अर्पण केली होती. मात्र या पोस्टसोबत तिने चुकून लता मंगेशकर यांचा फोटो वापरला. ही चूक लक्षात येताच तिने संबंधित फोटो तातडीने हटवला, परंतु तोपर्यंत हा प्रकार अनेकांनी पाहिला होता.
तिच्या या चुकीचे स्क्रीनशॉट समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आणि त्यानंतर तिला तीव्र टीकेचा सामना करावा लागला. अनेकांनी तिच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित करत अशा संवेदनशील प्रसंगी अधिक काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.काही वापरकर्त्यांनी या प्रकाराला प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न म्हणूनही संबोधले, तर काहींनी केवळ अज्ञानामुळे ही चूक झाल्याचे म्हटले. यामुळे समाजमाध्यमांवर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
या संपूर्ण वादावर अथिया शेट्टीकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र नंतर तिने दुरुस्त केलेली नवी श्रद्धांजली पोस्ट शेअर केली असून त्यात तिने आशा भोसले यांना योग्य आदरांजली वाहिली आहे. दरम्यान, या घटनेमुळे एका बाजूला वाद सुरू असतानाच संपूर्ण देशात आशा भोसले यांच्या निधनामुळे शोककळा पसरलेली असून सर्व स्तरातून त्यांना भावपूर्ण निरोप दिला जात आहे.