अमरावती
Bachchu Kadu प्रहार पक्षाचे प्रमुख व जिल्हा बँकेचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जगातील सर्वात उंच असणारे एव्हरेस्ट शिखराच्या बेस कॅम्पपर्यंत मजल मारली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला ते पोहोचले.
Bachchu Kadu ५३६४ मीटर (१७५९४ फुट) पर्यंत ८ दिवस त्यांनी ट्रेक केला. बोचणार्या उणे१५ डिग्री सेल्सियस थंडीमध्ये कोणत्याही व्हीआयपी सुविधा नसताना हा खडतर ट्रेक त्यांनी स्वतःच्या मुला सोबत पूर्ण केला. द अल्पायनिस्ट संस्थेच्या माध्यमातून एव्हरेस्टवीर भगवान चवले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अवघड असा ट्रेक सलग ८ दिवस केला. या ट्रेकवर जसे जसे उंच जावे तसं तसे अॅाक्सिजनचे प्रमाण कमी होत जाते. बेस कॅम्पवर फक्त ४५ टक्के अॅाक्सिजनचे प्रमाण आहे. Bachchu Kadu हाडे गोठवणारी थंडी आणि श्वसनाला होणारा त्रास अशा खडतर परिस्थितीत त्यांनी १४ सवंगड्यासह हा ट्रेक यशस्वी पूर्ण केला. महाराष्ट्रातील कदाचीत ते पहिले राजकीय व्यक्ती असावेत. दररोज साधारणतः १२ ते १४ किमीचा ट्रेक त्यांनी केला. शेवटच्या दिवशी तब्बल १७ किमीचा ट्रेक करावा लागला. त्यांनी भारताचे संविधान व भगवद्गीता सोबत नेली होती. Bachchu Kadu डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी ही मोहिम समर्पित केली आहे. नेपाळमध्ये ज्या सोयी सुविधा ट्रेक करण्यासाठी तयार केल्या आहेत. त्या सुविधा महाराष्ट्रातही केल्या जाव्यात, अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या ट्रेकमध्ये त्यांच्यासोबत मुलगा देवा कडू, महेश बडे (अभियान प्रमुख), केतन हिवंज होते.