तभा वृत्तसेवा
ढाणकी,
Bitergaon police station बिटरगाव परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि पोलिसांना तातडीने घटनास्थळी पोहोचता यावे, या उद्देशाने बिटरगाव पोलिस ठाण्यात तीन नवीन वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या वाहनांचे लोकार्पण आमदार किसन वानखेडे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात ही वाहने मंजूर करण्यात आली. यासाठी आ. किसन वानखेडे यांनी शासनाकडे विशेष पाठपुरावा केला होता. वाढते शहरीकरण, गुन्हेगारीवर त्वरित नियंत्रण मिळवून गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलिसांकडे गतीमान सुसज्ज वाहने ही काळाची गरज या निमित्ताने पूर्ण झाली.
या कार्यक्रम दरम्यान Bitergaon police station काँग्रेस नेते तथा माजी सभापती बाळासाहेब चंद्रे यांनी आपल्या भाषणामध्ये परिसरातील महत्त्वाच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले. त्यांनी बिटरगाव पोलिस कर्मचारी निवासासाठी ‘पोलिस वसाहत’ निर्मितीची गरज व्यक्त केली. तसेच ढाणकी-खरूस रस्त्यावरील नवीन पुलासाठी शासनाकडे तातडीने पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी आग्रही मागणी आ. वानखेडे यांच्याकडे केली.
या लोकार्पण प्रसंगी बिटरगाव पोलिस ठाणेदार पांडुरंग शिंदे, भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश चव्हाण, ढाणकी नगर उपाध्यक्ष दत्तदिगंबर वानखेडे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष रोहित वर्मा, शिवसेना शहरप्रमुख संजय सलेवाड, प्रकाश जयस्वाल, महेश पिंपरवार, नागेश रातोळे, दीपक चंद्रे, शंकर जाधव, महेश शहाणे, कांता वासमवार, उमेश योगेवार, जॉन्टी विणकरे, रमेश गायकवाड, रमन रावते, शेख अहेमद, मल्हार चंद्रे, विजय जयस्वाल, शेख जब्बार, शेख एजाज, विनोद कांबळे यांच्यासह पोलिस अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.