मुंबई
Bodies web series ओटीटी प्लॅटफॉर्मवर रहस्य आणि थराराचा अनुभव देणाऱ्या वेब सिरीजमध्ये 2023 साली प्रदर्शित झालेली बॉडीज ही सिरीज विशेष ठरली आहे. एका व्यक्तीचा मृतदेह चार वेगवेगळ्या काळात, पण एकाच ठिकाणी सापडण्याच्या अनोख्या आणि गूढ कथानकामुळे या सिरीजने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. विज्ञानकथा, अलौकिक शक्ती आणि गुंतागुंतीच्या रहस्यांचा संगम असलेली ही मालिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.आता परत रिरिलीज झाली आहे. या सीरिजने धुमाकूळ घातला आहे.
सिरीजची कथा लंडनमधील व्हाईटचॅपल परिसरातून सुरू होते, जिथे एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळतो. तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर येते की, हाच मृतदेह यापूर्वी 1890, 1941, 2023 आणि अगदी 2053 साली देखील त्याच ठिकाणी सापडलेला आहे. या विचित्र आणि अशक्यप्राय घटनेमुळे ब्रिटनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांचे गुप्तहेर गोंधळून जातात आणि पुढे तपासाची दिशा अधिकच गुंतागुंतीची बनते.
कथानक जसजसे पुढे सरकते, Bodies web series तसतसे वेगवेगळ्या काळातील घटना, पात्रे आणि त्यांच्यातील संबंध उलगडत जातात. मात्र प्रत्येक उलगडणाऱ्या धाग्यासोबत नवीन प्रश्न निर्माण होतात, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचते. केवळ आठ भागांमध्ये संपणारी ही सिरीज प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवते.या मालिकेची निर्मिती आणि लेखनपॉल टॉमलिन यांनी केले असून, दिग्दर्शन मार्कोr आणि वांग यांनी केले आहे. ही सिरीज 2014-15 मधील डीसी व्हर्टिगोच्या त्याच नावाच्या ग्राफिक नॉव्हेलवर आधारित आहे.