आदिवासी विकास विभागाच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहचवा : डॉ. भोयर

आदिवासी विकास विभागाची कार्यशाळा

    दिनांक :13-Apr-2026
Total Views |
वर्धा
Tribal Development Departmen शासकीय कार्यालयाच्या इमारतीतून जनसामान्यांची कामे व्हावी. विशेषतः आदिवासी बांधवांसाठी असलेल्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात प्रशासनाने कसूर करू नये. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तरुण पिढीनेही चिकित्सक बनून शासन निर्णयांचा अभ्यास करावा आणि शासनाच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहचवाव्या, असे आवाहन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
  
pankaj bhoyar
Tribal Development Departmen जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी., प्रकल्प अधिकारी गितांजली निकम, नगरसेवक विजय उईके, मोहिनी आडे, सालोडचे सरपंच अमोल कन्नाके आदी उपस्थित होते.
Tribal Development Departmen शासन आदिवासी समाजासाठी शेकडो योजना राबविते. आदिवासी विकास विभागाच्या सर्व योजनांची सुटसुटीत माहिती देणारी पुस्तिका तयार करून ती दुर्गम भागात वाटा. केवळ ऑनलाइन अर्जाची वाट न पाहता, तालुका निहाय कॅम्प लावून लोकांकडून अर्ज भरून घेण्याची व्यवस्था करा. जिल्ह्याला मिळालेले उद्दिष्ट केवळ अर्जांअभावी परत जाणे चुकीचे आहे. जास्तीत जास्त अर्ज भरून घेण्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घ्या आणि वर्कशॉप आयोजित करा, अशा सूचनाही त्यांनी आदिवासी विकास विभागाला दिल्या.
Tribal Development Departmen यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी. म्हणाल्या, आदिवासी समाजात शिक्षण व शिष्यवृत्ती याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. उत्पन्न वाढीसाठी गाव व तालुकानिहाय योजनांची शिबिरे आयोजित करा. योजनांचे अर्ज ग्रामपंचायतस्तरावर भरून घेतले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. सुरूवातीला प्रकल्प अधिकारी गितांजली निकम यांनी आदिवासी विभागाच्या योजनांचे सादरीकरण केले.
शुभमच्या जिद्दीचे कौतुक
Tribal Development Departmen कार्यक्रमाच्या शेवटी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आकोली येथील एका शेतकर्‍याचा मुलगा शुभम मुरले याचा सत्कार केला. शुभमच्या जिद्दीचे कौतुक केले. शुभमने स्वतः ड्रोन तयार केले असून, त्याच्या या प्रयोगाबद्दलची माहिती उपस्थितांनी घ्यावी आणि अशा नाविन्यपूर्ण गोष्टींना पाठबळ द्यावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. यावेळी पालकमंत्र्यांनी उपस्थित विद्यार्थी व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांनी अभ्यासिका, वसतिगृहाबाबत केलेल्या मागण्या पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या.