आर्य वैश्य समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबद्द : आ. सुधीर मुनगंटीवार

    दिनांक :13-Apr-2026
Total Views |
गडचिरोली,
mla sudhir mungantiwar आपला आर्य वैश्य समाज देशाच्या कानाकोपर्‍यात भरपूर प्रमाणात आहे, मात्र तो विखुरलेला आहे. त्यामुळे समाज बांधवांनी एकत्र येण्यासाठी विविध कार्यक्रम, समाज मेळावे आदी कार्यक्रम करणे गरजे आहे. समाजासाठी विविध कल्याणकारी योजना आहेत. मात्र त्या समाजबांधवापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. त्यासाठी असे कार्यक्रम आयोजन करून समाजबांधव संघटीत होणे असून आपण आर्य वैश्य समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी सदैद कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
 

आर्य वैश्य समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी  
 
आर्य वैश्य समाज, तथा श्री कन्याका परमेश्‍वरी देवस्थान समिती गडचिरोली यांच्यातर्फे आयोजित श्री माता वासवी कन्याका परमेश्‍वरी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना तसेच महापूजा व महाआरती माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार व त्यांच्या अर्धांगिनी सपना मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आली.mla sudhir mungantiwar यावेळी ते बोलत होते.
यावेळी श्री माता वासवी कन्याका परमेश्‍वरी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाला आमदार सुधीर मुनगंटीवार, सपना मनगंटीवार यांच्यासह आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष अ‍ॅड. प्रणोती निंबोरकर, नगरसेवक सागर निंबोरकर, महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार तसेच आर्य वैश्य समाज व गावातील नागरिक उपस्थित होते.