स्मार्ट मीटरमुळे ग्राहकाला अवाजवी वीज देयक

मीटर बदलविण्यास वीज वितरण कंपनीची टाळाटाळ

    दिनांक :13-Apr-2026
Total Views |
सेलू
smart meters बोरी बोरधरण येथे असलेल्या रिसॉर्टवर सोलर पॅनल असूनही ग्राहकाला स्मार्ट मीटरमुळे अवाजवी देयक येत आहे. या अवाजवी देयकामुळे ग्राहकाचे कंबरडे मोडले असून तक्रार करूनही वीज वितरण कंपनी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे.
smart meter 
smart meters बोरी येथील व्यावसायिक विनोद गोमासे यांचे रिसॉर्ट असून त्यांनी या ठिकाणी १० किलो वॅटचे व्यावसायिक सोलर पॅनल लावले आहे. एक वर्षातच मीटर जळाल्याने त्यांनी तक्रार केल्यानंतर त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसविण्यात आले. पण, हे स्मार्ट मीटर लागले अन् गोमासे यांना वीज देयकापोटी अवाजवी रकम भरावी लागत आहे. यासंदर्भात त्यांनी हिंगणी येथील वीज वितरण कार्यालयात धाव घेत मीटर टेस्टिंगची मागणी केली. पण, पाच महिने लोटूनही टेस्टिंग करून देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप गोमासे यांनी केला आहे. १७ मार्च रोजी वीज वितरण हिंगणीचे कनिष्ठ अभियंता यांच्याकडे तशी तक्रारही दाखल केली आहे.
smart meters सोलर पॅनलवर लाखो रुपये खर्च करून जर स्मार्ट मीटरमुळे जास्त वीज देयक येत असेल तर त्या सोलर पॅनल काय कामाचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.