आजनसरा
Ajansara Sant Bhojaji Maharaj विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्या क्षेत्र आजनसरा येथे उद्या १४ रोजी संत भोजाजी महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत येणार्या लाखो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने वर्धा नदीच्या तिरालगत असलेल्या श्रीक्षेत्र आजनसरा येथे संत भोजाजी महाराजांच्या प्रती श्रद्धा असलेले असंख्य भाविक नतमस्तक होण्यासाठी येणार असल्याने भोजाजी भतांचा जनसागर उसळणार आहे. येथे पुरण पोळीच्या नैवेद्याला मान असल्याने येथे प्रसादात पुरणाच असते. Ajansara Sant Bhojaji Maharaj हजारो क्विंटल पुरणाचा नैवैद्य महाराजांना अर्पण होणार असल्याने आसमंतात पुरणाचा सुगंध दरवळणार आहे. ग्राम दैवताच्या पुण्यतिथीला गावात दिवाळी साजरी होणार आहे.
Ajansara Sant Bhojaji Maharaj दिंडी, अभंग आणि भतिभाव; आजनसरा नगरी झाली पंढरीचा ठाव असा अनुभव घेत भोजाजी महाराज देवस्थानच्या वतीने भतांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दिंडी सोहळा पाहण्यासाठी दुर दुरून भाविक हजेरी लावत असतात. दिंडी वर्धा नदीच्या तिरावरून परिक्रमा करीत असताना भाविकांना आपण पंढरपुरलाच असल्याचा भास होतो. गावात घरोघरी पाहुणे, प्रवचनकार, कीर्तनकार व वारकरी संप्रदायातील लोकांचा निवास आहे. पुण्यतिथी महोत्सवात आपसातील मतभेद विसरुन वाट्याला येईल ती सेवा गावकर्यांतर्फे केली जाते. त्यामुळे या उत्सवाचा नावलौकिक संपूर्ण विदर्भात पसरला आहे.
Ajansara Sant Bhojaji Maharaj हे सर्व काही घडवून आणतात ते संत आपण केवळ नाममात्र अहोत असे येथील गावकारी भावूक होऊन सांगतात. गावातील प्रत्येक आबालवृद्धाचा येथे सहभाग असतो. भगव्या पताका, भजनी दिंड्या, भोजाजी नामाचा गजर करीत वारकरी संप्रदायाची पताका तेवत ठेऊन भोजाजी महाराजांच्या जयघोषात तल्लीन होऊन जातात. भोजाजी महाराजांच्या प्रती श्रद्धा असलेले विदर्भातील असंख्य भाविक भत या पुण्यतिथी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. Ajansara Sant Bhojaji Maharaj पुण्यतिथी सोहळ्याला येणार्या सर्व भाविक भक्तांच्या स्वागताची तयारी मंदिराचे अध्यक्ष डॉ. विजय पर्बत, उपाध्यक्ष धनराज मेश्राम, सचिव शिवदास पर्बत, कोषाध्यक्ष नामदेव गाढवे, सहसचिव राजेंद्र ढवळे, विश्वस्त रमेश ठाकरे, रामा कोपरकर, विनोद आष्टनकर, श्रावण काचोळे, शालिनी ईखार, महेश कोसूरकर, अंकुश ढवळे, संतोष सुपारे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे.