१५ एप्रिलपासुन दुरांतोचा वर्धेला थांबा

वर्धेकरांच्या संघर्षाला मोठे यश

    दिनांक :13-Apr-2026
Total Views |
वर्धा,
duronto to stop at wardha वर्धेकरांची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी पूर्ण झाली आहे. अत्यंत वेगवान मानली जाणारी नागपूर-मुंबई-नागपूर दुरांतो एसप्रेस वर्धा रेल्वेस्थानकावर १५ एप्रिल पासून थांबणार आहे.
 

वर्धा दुरांतो  
 
 
केंद्र सरकारने वर्धा जिल्ह्याला दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. ‘रेल वन’ या अधिकृत वेबसाईटवर या थांब्यासाठी आता बुकिंग सुरू झाले आहे. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर आणि माजी खासदार रामदास तडस यांनी या थांब्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. प्रवाशांची गरज लक्षात घेऊन थांबा लवकरात लवकर सुरू व्हावा, यासाठी या दोन्ही नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांना आज पूर्ण यश आले आहे.
 
गाडी क्रमांक १२२९० (नागपूर-मुंबई)साठी वर्धा जंशनकरिता रेल्वेने विशेष आरक्षित कोटा मंजूर केला आहे. यामुळे वर्धेतून प्रवास करणार्‍या प्रवाशांना ‘कन्फर्म’ तिकीट मिळणे अधिक सुलभ होणार आहे.duronto to stop at wardha प्रथम वातानुकूलित (१ एसी) २ बर्थ, द्वितीय वातानुकूलित (२ एसी) ६ बर्थ, तृतीय वातानुकूलित (३ एसी) ६४ बर्थ आणि शयनयान श्रेणी (स्लिपर) २० बर्थ असा कोटा आहे. मध्य रेल्वेचे सदस्य तथा वर्धा जिल्हा भाजपाचे सचिव प्रणव जोशी यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली.