पाच प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकर्‍यांनी केले विष प्राशन

राजुरा उपविभागीय अधिकारी कार्यालयातील घटना

    दिनांक :13-Apr-2026
Total Views |
राजुरा,
tribal farmers consumed poison राजुरा उपविभागांतर्गत येणार्‍या कोरपना तालुक्यातील माणिकगड सिमेंट कंपनीच्या (अल्ट्राटेक) खाणीने कुसुंबी येथील कोलाम व आदिवासींच्या जमिनीचा मोबदला द्यावा किंवा जमिनी परत कराव्यात, या मागणीसाठी हताश झालेल्या पाच प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकर्‍यांनी अखेर उपविभागीय अधिकारी कार्यालयात विष प्राशन केले.
 

tribal farmers consumed poison 
 
 
गेल्या 15 वर्षांपासून प्रशासकीय पातळीवर आणि माणिकगड सिमेंट कंपनीसोबत आदिवासींचा लढा सुरू आहे. मात्र, सतत पाठपुरावा करूनही हा वाद निकाली न निघाल्याने अखेर सोमवार, 13 एप्रिल रोजी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास पाच आदिवासी शेतकर्‍यांनी राजुरा उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांच्या कार्यालयात विष घेतले. पाच शेतकर्‍यांनी एकाच वेळी विष प्राशन केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
 
राजुरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचून या पाचही आदिवासी शेतकर्‍यांना उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. सर्वांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नंतर चंद्रपूर जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. विष प्राशन करणार्‍या शेतकर्‍यांमध्ये लच्चू चिन्नू मडावी (55, रा. बांबेझरी) जयराम गंगु मडावी (45, रा. नोकारी), जंगु सोमा पेंदोर (48, रा. कुसूंबी), बालाजी शिडाम(52, रा. नोकारी) व मारोती कर्णू तलांडे (55, रा. कुसुंबी) यांचा समावेश आहे.
 
माणिकगड सिमेंट कंपनी (अल्ट्राटेक) या कंपनीतील चुनखडी दगडाच्या (लाईम स्टोन) खाणीत कुसुंबी येथील शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या आहेत. या प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी गेल्या 15 वर्षापासून निवेदन, आंदोलन करून हक्क मागण्याचा प्रयत्न केला, मात्र माणिकगड सिमेंट कंपनीने दाद दिली नाही आणि सरकारनेही याबाबत आदिवासी शेतकर्‍यांना हक्क देण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, असा या शेतकर्‍यांचा आरोप आहे.tribal farmers consumed poison दहा महिण्यापूर्वी सर्व्हे क्रमांक 44, 45, 46, 47 या जमिनीची मोजणी करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांनी दिले. मात्र, दहा महिन्यापासून मोजणीच झाली नाही. मोजणी झाल्याशिवाय मोबदला अथवा ताबा मिळू शकणार नसल्याने अखेर संतप्त झालेल्या आदिवासी शेतकर्‍यांनी उपविभागीय कार्यालयात विष घेतले. या प्रकरणी राजुरा पोलिस अधिक तपास करीत आहेत.