पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग खपवाल तर थेट जेलमध्ये जाल

अन्न व औषध प्रशासनाचे हॉटेल चालकांना आदेश

    दिनांक :13-Apr-2026
Total Views |
बुलढाणा
Food and Drug Administration Buldhana हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये पनीरच्या नावाखाली स्वस्त आणि आरोग्यास अपायकारक ’चीज अ‍ॅनालॉग’चा वापर करून ग्राहकांची फसवणूक करणार्‍या व्यावसायिकांवर आता अन्न व औषध प्रशासन कडक कारवाई करणार आहे. पनीरऐवजी अशा पर्यायी घटकांचा वापर करणार्‍यांनी मेन्यू कार्डवर त्याबाबत स्पष्ट उल्लेख करणे अनिवार्य असून, नियमांचे उल्लंघन केल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
 
 paneer
Food and Drug Administration Buldhana जिल्ह्यातील अनेक हॉटेल, रेस्टॉरंट, कॅटरर्स आणि मिठाई विक्रेते पनीरऐवजी दिसायला पनीरसारख्याच असलेल्या ’चीज अ‍ॅनालॉग’ या पदार्थाचा वापर करतात. विशेष म्हणजे, हा पदार्थ बनवताना दुधाचा वापर केला जात नाही. त्याऐवजी पाम तेल, स्किम्ड मिल्क पावडर, वनस्पती तूप आणि फूड ग्रेड अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड यांसारख्या घटकांचा वापर केला जातो. हा पदार्थ पनीरपेक्षा स्वस्त असल्याने नफेखोरीसाठी ग्राहकांना याची माहिती न देता तो विकला जातो, जे अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन आहे.अन्न व औषध प्रशासनाने या संदर्भात ३० एप्रिल २०२६ पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे.
Food and Drug Administration Buldhana जे व्यावसायिक नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा सहाय्यक आयुक्त यांनी दिला आहे. तसेच हॉटेलमध्ये पनीरची डिश ऑर्डर करताना ती खरोखर दुधाच्या पनीरची आहे की पाम तेलाच्या चीज अ‍ॅनालॉगची हे तपासण्याचे आवाहनही प्रशासनाने नागरिकांना केले आहे.