देवळी
Central Road Fund शिरजगाव-आजनसरा-पोहणा या रस्त्याच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी केंद्रीय रस्ते निधी (सीआरएफ) अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आ. राजेश बकाने आणि आ. समीर कुणावार यांनी केली. या मागणीची तत्काळ दखल घेत ना. गडकरी यांनी सीआरएफ अंतर्गत सदर रस्ता पूर्ण करण्याची घोषणा त्यांनी केली.
Central Road Fund श्रीक्षेत्र आजनसरा येथे संत भोजाजी महाराज यांच्या दर्शनानंतर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यादरम्यान वर्धा नदीवरील महत्त्वपूर्ण पुलाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा रविवार १२ रोजी उत्साहात पार पडला. या सोहळ्याला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान आ. राजेश बकाने यांनी आपल्या मतदारसंघाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत एमडीआर-४९ शिरजगाव-आजनसरा-पोहणा या रस्त्याच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी केंद्रीय रस्ते निधी (सीआरएफ) अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे ना. नितीन गडकरी यांच्याकडे केली. Central Road Fund या मागणीला हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांनीही पाठिंबा देत सदर रस्ता हा दोन्ही मतदारसंघांसाठी अत्यावश्यक असल्याची बाब ना. गडकरी यांच्या लक्षात आणून दिली. दोन्ही आमदारांनी एकत्रितपणे मांडलेल्या या मागणीची दखल घेत ना. गडकरी यांनी आपल्या भाषणातूनच सदर रस्ता पूर्ण करण्याची घोषणा केली.
Central Road Fund विशेष म्हणजे, या रस्त्याच्या विकासामुळे संत भोजाजी महाराज देवस्थानात येणार्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे भाविकांना प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता; मात्र रस्ता सुधारित झाल्यानंतर देवस्थानाकडे जाणे अधिक सुरक्षित, सुलभ व जलद होणार आहे.
Central Road Fund एमडीआर-४९ हा मार्ग शिरजगाव, आजनसरा व पोहणा या गावांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा असून, शेतमाल वाहतूक, विद्यार्थ्यांची ये-जा तसेच आपत्कालीन सेवांसाठीही अत्यावश्यक आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी प्रलंबित होती. आ. बकाने यांनी हा विषय प्राधान्याने घेत सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा केला. याला आ. कुणावार यांच्या पाठिंब्यामुळे आणखी बळ मिळाल्याने अखेर निधी मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाला. या निर्णयामुळे शिरजगाव-आजनसरा-पोहणा परिसरातील नागरिकांसह भाविकांनाही मोठा फायदा होणार असून धार्मिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे.