अमरावती
Dr. Praveen Togadia Amravati राष्ट्रीय बजरंग दल व आंतराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून हिंदूंना संघटीत करण्यासाठी हनुमान चालीसा केंद्र स्थापन करण्यात येत आहे. या केंद्रच्या माध्यमातून फक्त धार्मिकच नव्हे तर आरोग्य शिबिर, रोजगार प्रशिक्षण वर्ग, गोरगरिबांसाठी धान्य संकलन, देश भरातल्या गरजवंत हिंदूंना तातडीने सर्व प्रकराची मदत असे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती उपरोक्त दोन्ही संघटनेचे प्रमुख डॉ. प्रवीण तोगडीया यांनी दिली.
Dr. Praveen Togadia Amravati अमरावती दौर्यावर आले असता त्यांनी सोमवारी समाजसेवक चंद्रकुमार जाजोदीया यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे ते म्हणाले, अमरावतीत सध्या ९ हनुमान चालीसा केंद्र गठीत झाले आहे. १०१ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. संपूर्ण देशात ३० हनुमान चालीसा केंद्र उभे राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे. ज्या युवकांना रोजगाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, त्यांना रोजगार देण्याची जबाबदारी आम्ही स्विकारणार आहे. हिंदूंची लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे. भविष्याच्या दृष्टीने ते धोकादायक आहे. त्यामुळे आम्ही हिंदू कुटुंबांना तीन अपत्याचा आग्रह करतो आहे. बाजारपेठेत खरेदी करताना हिंदू दुकानदारांकडूनच खरेदी करावी, असे आवाहन आम्ही केले आहे. शेतमालाला चांगला भाव मिळाला आवश्यक आहे. Dr. Praveen Togadia Amravati देश भरातल्या हिंदूंना कोणत्याही स्वरूपाची मदत हवी असेल त्यांनी आमच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा. आम्ही आवश्यक ती मदत तातडीने देणार आहोत. हनुमान चालीसा केंद्रातील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एक मुठ्ठी अनाज हे अभियान घरोघरी जाऊन राबविले जाणार आहे. कोणाताही व्यक्त उपाशी राहू नये या उद्देशाने अभियान हाती घेण्यात आले असून गरजवंतांपर्यंत हे धान्य पोहोचविले जाईल. हिंदू कुटुंबांना संघटन करून समाजपयोगी कार्य करण्याचा आमचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला अर्चित जाजोदीया, विक्की शर्मा, आकाश शिरभाते, किशोर गोयनका, करण धोटे, महेश साहू, चेतन वाटनकर, अनिकेत जोशी, राजन आडतीया, प्रथमेश अढाऊ, माधुरी काळसरपे यांच्यासह अन्य उपस्थित होते.
केंद्र सरकारचे काम योग्य दिशेने
Dr. Praveen Togadia Amravati केंद्रातल्या मोदी सरकारचे का योग्य दिशेने सुरू आहे. श्रीराम मंदिर झाल्यापासून माझी सरकारवर असलेली नाराजी दूर झाली. देभरात जेहादींचा उपद्रव वाढत आहे. त्याला लगाम लावण्याचे प्रयत्न होत असलेल तरी ते नवनव्या पद्धतीने अराजकता पसरवित आहे. सरकारने त्यावर कठोर कारवाई करणे गजरेचे आहे, असे डॉ. तोगडीया यांनी स्पष्ट केले.