कारंजा (घा.)
theft cases Karanja कारंजा येथील दोन आणि नारा येथील एक अशा तीन चोरीच्या घटनांचा कारंजा पोलिसांनी तपास करून अमन सिसोदिया रा. पिपरीया जि. राजगड (मध्यप्रदेश) याला अटक केली.
theft cases Karanja शहरातील धनराज शालिकराम भांगे यांनी ७ जानेवारी रोजी बँकेतून पेन्शनचे ४० हजार रुपये काढून पंचायत समिती चौकात थांबले होते. दरम्यान, त्यांना पिशवीत ठेवलेले ४० हजार रुपये दिसून न आल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून कारंजा पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. यादरम्यान अमन सिसोदिया याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्याने १४ फेब्रुवारी रोजी नारा येथील मोहन खवशी यांच्या घरासमोरून बोलेरो चोरून नेल्याचे कबुल केले. मागील महिन्यात गोळीबार चौकातील जसानी यांच्या दुकानाचे शेटर तोडून दुकानातील पैशावरही डल्ला मारल्याची कबुली दिली.
theft cases Karanja ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशीव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रल्हाद मदन, पोलिस उपनिरीक्षक सागर महल्ले, सतीश जायभाये, प्रवीण चोरे, संदीप कावरे, आशिष कालोकार, दिनेश घसाड, मंगेश मिलके, खुशाल चाफले यांनी केली.