काेराडी औष्णिक विद्युत प्रकल्पात माेठा अपघात

- पीप हाेलमधील वाेने आठ जण भाजले - चाैघे गंभीर जखमी, चाैघे किरकाेळ जखमी

    दिनांक :13-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
accident at karadi thermal power project महानिर्मितीच्या काेराडी औष्णिक विद्युत प्रकल्पात युनिट क्रमांक 10 मध्ये 13 मीटर उंचीवरील मजल्यावर क्लिंकर पाडत असताना बाॅयलरमधील पीप हाेलमधून वाफ बाहेर आल्याने 8 जण भाजल्या गेले. आठपैकी चाैघे गंभीर जखमी झाले. आठही जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना साेमवारी सकाळी 10.20 मिनिटांनी घडली. या घटनेमुळे प्रकल्पात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर कामगारांनी गाेंधळ घालून धावपळ केली. सचिन भागेवार, विवेक पाटील, तेजस साेनवणे, ए.के. काझी, निखिल जायतगुडे, कमलेश बारमटे, गुलसिंग टिकाम, विलास बन्साेड अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
 

काेराडी औष्णिक विद्युत प्रकल्पात माेठा अपघात 
 
 
सूत्रांच्या माहितीनुसार, काेराडी औष्णिक विद्युत प्रकल्पातील 660 मेगावॅटच्या संच क्रमांक 10 मध्ये साेमवारी सकाळी दहा वाजता वीज निर्मिती प्रक्रिया सुरू हाेती. दरम्यान, काेराडी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्र.10 मध्ये सुमारे 13 मीटर उंचीवरील मजल्यावर क्लिंकर पाडत असताना अचानक बाॅयलरमधील पीप हाेलमधून वाफ बाहेर आली. त्यामुळे गरम वाेत आणि गरम राख काही मजूर आणि अधिकाèयांच्या अंगावर पडली. यामध्ये आठ जण जखमी झाले. अचानक घडलेल्या घटनेमुळे भाजल्याने जखमी झालेले कामगार आणि अधिकारी आरडाओरडा करू लागले. हा प्रकार पाहून परिसरात खळबळ उडाली. तातडीने उपस्थितांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने मानकापूर परिसरातील मॅक्स हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर महानिर्मितीचे सचिन भागेवार, तेजस साेनवणे व विलास बन्साेड यांना किरकाेळ जखमा असल्यामुळे तिघांना उपचारानंतर रुग्णालयातून सूटी देण्यात आली.तसेच ए.के.काझी यांना साेमवारी सायंकाळपर्यंत रुग्णालयातून सुटी देण्यात येणार आहे. उर्वरित विवेक पाटील, निखिल जायतगुडे, कमलेश बारमटे, गुलसिंग टिकाम या 4 जणांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. घटना घडताच महानिर्मितीर्माफत तात्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे. सदर घटनेचे सुरक्षा विभागार्ते ‘सेफफ्टी ऑडिट’ सुरू करण्यात आले असून प्रथमदर्शनी सुरक्षा नियमांचे काेणतेही उल्लंघन झालेले दिसून येत नसल्याची माहिती महानिर्मितीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
महानिर्मितीकडून उपचाराचा खर्च
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महानिर्मिती) र्ते सर्व जखमींना सर्वाेत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यात येत असून अपघातग्रस्त कर्मचाèयांचा वैद्यकीय उपचारांचा सर्व खर्च महानिर्मितीर्ते करण्यात येणार आहे.accident at karadi thermal power project तसेच जखमींची याेग्य ती काळजी घेण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
माेठी दुर्घटना घडण्यापूर्वीच व्हावे सावध
महानिर्मितीच्या काेराडी औष्णिक विद्युत प्रकल्पात यापूर्वीसुद्धा अनेक घटना घडल्या आहे. यापूर्वी ओझाेन वायू गळतीमुळेही काही कामगार जखमी झाले हाेते.यासह अन्य विविध घटनांमध्ये कामगार जखमी झाले हाेते. आता गरम राख आणि गरम वाफ अंगावर पडून 8 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे येथे वारंवार घटना घडत असल्यामुळे माेठी दुर्घटना घडण्यापूर्वीच महानिर्मितीने सावध व्हावे, असा सल्ला विद्युत क्षेत्रात काम करणाèया विविध संघटनांकडून दिल्या जात आहे.
.......