हरिद्वारमध्ये मोठा अनर्थ टळला; २१ भाविकांना सुरक्षितपणे वाचवले

    दिनांक :13-Apr-2026
Total Views |

 averted in Haridwar
 
 
हरिद्वार 
major disaster was averted in Haridwar उत्तराखंडमधील हरिद्वार येथे गंगेच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. कबीर कुटीर घाट आणि सप्तर्षी परिसराजवळील एका लहान बेटावर स्नानासाठी गेलेले काही भाविक पाण्याच्या वाढत्या२१ भाविक अडकले. ज्यामध्ये पुरुष, महिला आणि लहान मुलांचा समावेश होता. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सप्तर्षी पोलीस ठाण्याचे पथक आणि जल पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्रशिक्षित पाणबुड्यांच्या मदतीने तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. पोलीस आणि बचाव पथकाने अत्यंत कौशल्याने सर्व भाविकांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले. या कारवाईत दहा पुरुष, सात महिला आणि चार लहान मुलांचा यशस्वी बचाव करण्यात आला. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे मोठी दुर्घटना टळली असून सर्व भाविक सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.