वरोड्यात रवी कमल जिनिंगला भीषण आग

१० करोड रुपये नुकसानीचा अंदाज आग विझवण्यासाठी आठ बंब प्रयत्नशील

    दिनांक :13-Apr-2026
Total Views |
वरोडा
Ginning fire Varoda शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर मार्डा रस्त्यावर असलेल्या रवी कमल कोटेक्स जिनिंगला सोमवार, १३  एप्रिल रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत जवळपास दहा ते बारा हजार क्विंटल कापूस जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेत १० करोड रुपये नुकसानीचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
 
fire 
Ginning fire Varoda सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास जिनिंगला लागलेली ही आग विझवण्यासाठी विविध ठिकाणांचे आठ बंब प्रयत्न करत असतानाही वृत्त लिहीस्तोवर आग आटोक्यात आली नव्हती.
Ginning fire Varoda  आग लागल्याचे वृत्त कळताच प्रशासन खडबडून जागे झाले. तहसीलदार योगेश कौटकर, संवर्ग विकास अधिकारी गजानन मुंडकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव चंद्रसेन शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष बाकल, पोलिस निरीक्षक सोनटक्के हे आपल्या ताफ्यासह त्वरेने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझवण्यासाठी आवश्यक ती कारवाई सुरू केली. ही आग विझवण्यासाठी वणी, वरोडा, भद्रावती नगरपरिषदेचे तसेच हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती, जीएमआर, साई वर्धा, डब्लूसीएल आणि चंद्रपूर महानगरपालिकेचे बंब घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु, चार तास झाले असतानाही आग विझवण्यात यश आले नव्हते. या आगीत जिनिंगमधील कापूस हलविण्यासाठी उपयोगात येणारे एक वाहन जळून खाक झाले.
Ginning fire Varoda जिनिंगमध्ये कर्मचार्‍यांच्या चहापानाची व्यवस्था करणारी गिताबाई नामक महिला कर्मचारी मात्र लागलेली ही प्रचंड आग बादलीने विझवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे आढळून आले. गेले दोन दिवस जिनींग मागील कामकाज बंद होते. त्यामुळे आगीचे कारण समजू शकले नाही. या सुट्टीत जिनींगमध्ये काही काम केल्या जात असल्याची चर्चाही दबक्या आवाजात परिसरात ऐकावयास मिळाली.

कापूस गाठी भरलेला ट्रक बचावला
Ginning fire Varoda  सोमवारी दुपारी आरजे २१ , जी ९१४७  या क्रमांकाच्या ट्रकमध्ये कापसाच्या गाठी भरण्याचे काम सुरू होते. सर्वत्र आग लागल्याने ट्रकला बाहेर निघता आले नाही. ट्रकच्या समोरील भागास आग लागली. अग्निशामक दलाने त्या आगीवर नियंत्रण मिळवले. जळालेला कापूस तातडीने बाजूला करून कापूस गाठी भरलेल्या ट्रकला बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला.