पैशांच्या हव्यासापाेटी वृद्धाची गळा आवळून हत्या

पाेटच्या मुलीसमाेरच साेडला वडिलांनी जीव

    दिनांक :13-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
Nagpur murder case घरात एकट्या राहणाèया वृद्धाच्या घरात तीन चाेरटे शिरले. त्यांनी पैशांच्या हव्यासापाेटी वृद्धाला मारहाण करणे सुरु केले. तेवढ्यात शेजाèयाने वृद्धाच्या मुलीला माहिती दिली. मुलगी वडिलांच्या घरी पाेहचताच चाेरट्यांनी वृद्धाचा गळा आवळून खून करीत पळ काढला. मुलीच्या डाेळ्यासमाेरच वडिलांचा जीव गेला. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास वडधामण्यात घडली. सहेसराम बाजीराव केवट (60) असे मृताचे नाव आहे.
 

Nagpur murder case elderly man, robbery murder 
सूत्रांच्या माहितीनुसार, कृष्णानगर, स्वामी समर्थ मंदिराजवळ राहणारे सहेसराम केवट हे अपंग असून ते घरी एकटेच राहत हाेते. त्यांच्या दाेन्ही विवाहित असून वस्तीतच राहतात. केवट यांना शासनाकडून दरमहा मिळणाèया मानधनाचे पैसे लुबाडण्याच्या उद्देशाने रविवारी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास आराेपी विलास सुभाष चाैधरी (27), जितेंद्र संताेष वगारे (25) आणि प्रवीण ढिल्लन चव्हाण (सर्व रा. सुराबर्डी वस्ती) यांनी घरात प्रवेश केला. तीनही आराेपींनी सहेसराम यांना पैशाची मागणी केली. मात्र, त्यांनी आराेपींना विराेध केला. यामुळे संतापलेल्या आराेपींनी संगनमत करून सहेसराम यांचे उशीने ताेंड दाबले आणि गळा आवळून त्यांना Nagpur murder case जीवे ठार मारले. या प्रकरणी मृत वृद्धाची मुलगी रिमा हेमंत पटेल (22) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाडी पाेलिसांनी हत्याकांडाचा दाखल केला आहे. पाेलिस उपनिरीक्षक उत्तम जायभाये यांनी तातडीने तपास करीत मुख्य आराेपी विलास चाैधरी याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून इतर दाेन फरार आराेपींचा शाेध पाेलिस घेत आहेत. पुढील तपास वाडी पाेलिस करत आहेत.