सिंदी (रेल्वे)
National Highways Authority of India राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात मोडणार्या ३५३ क्रमांकाच्या महामार्गाच्या कामाला गती प्रदान करण्यासाठी नव्याने ३२० कोटी रुपयांचा डीपीआर तयार करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी १२ रोजी जाम येथील पायाभरणी सोहळ्यात संबंधित अधिकार्यांना दिले.
National Highways Authority of India रविवारी जाम येथे आयोजित वैद्यकीय महाविद्यालय तथा वसतिगृहाच्या इमारतीचे भूमिपूजनाला ना.गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर लोकप्रतिनिधींनी हजेरी लावली होती. त्यावेळी नगराध्यक्ष राणी कलोडे यांनी भाजपाच्या कार्यकर्ते व नगरसेवकांसह ना. गडकरी यांची भेट घेतली.
National Highways Authority of India सदर महामार्गाचे काम कासवगतीने सुरू असल्यामुळे नागरिकांना असुविधेचा सामना करावा लागत असल्याचे ना. गडकरी यांच्या निदर्शास आणून दिले. आ. समीर कुणावार यांनी देखील सदर मार्ग अविलंब तयार व्हावा, अशी भूमिका मांडली. मागणीची दखल घेत ना. नितीन गडकरी यांनी सदर महामार्ग सेलडोह ते सेवाग्रामपर्यंत असून कांढळी ते सेलडोहपर्यंतचे बांधकाम निधी कमी पडल्यामुळे खोळंबले होते. त्यामुळे नवीन डीपीआर तयार करून ३२० कोटी रुपये खर्चून हे काम विहित मुदतीत पूर्ण होईल, असे जाहीर केले.
National Highways Authority of India महामार्ग सिंदी शहरातील लोकवस्तीतून जाणार आहे की बायपास निघेल, याचा उलगडा नवीन डीपीआर तयार झाल्यानंतरच होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारानेच या भागाचा चहूमुखी विकास होणार, असे मत नगराध्यक्ष राणी कलोडे यांनी यावेळी व्यत केले.