बुलढाणा
Painganga Society Buldhana पैनगंगा कृषक सेवा सहकारी संस्था मर्यादित, पाडळी या ग्रामसेवा सोसायटीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत महायुतीने जबरदस्त कामगिरी करत बळीराजा पॅनलच्या सर्वच्या सर्व १३ जागांवर विजय मिळवून महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला. आ. संजय गायकवाड यांच्या सक्षम व प्रभावी नेतृत्वाखाली हा विजय संपादन करण्यात आला.

Painganga Society Buldhana या निवडणुकीत महायुतीच्या बळीराजा पॅनलने सर्वसाधारण गट, महिला गट, अनुसूचित जाती, भटया-विमुक्त जाती तसेच इतर मागास प्रवर्ग अशा सर्वच गटांमध्ये एकतर्फी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. निवडून आलेल्या सदस्यांमध्ये सर्वसाधारण गटातून जीवन कुमार कडूबा पवार, भास्कर भाऊराव रिंढे,श्रीकांत आत्माराम पवार, दौलत श्रीरंग सुरगडे, शंकर कडूबा तायडे, मोहन मोतीराम धनावत, अशोक किसन तांगडे आणि राजेंद्र नथूसिंग राजपूत यांचा समावेश आहे.महिला सर्वसाधारण प्रवर्गातून सुलोचनाबाई सारंगधर दांडगे व मंदाबाई राजेंद्र गायकवाड या विजयी झाल्या. भटया जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्गातून जगदेव कडूबा नपते, Painganga Society Buldhana अनुसूचित जाती प्रवर्गातून भीमराव सुखदेव जाधव, तर इतर मागास प्रवर्गातून अंबादास सखाराम पवार यांनी विजय संपादन केला.दरम्यान, या दणदणीत विजयाच्या पार्श्वभूमीवर आज दि. १३ एप्रिल २०२६ रोजी बुलढाणा येथील शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालयात नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. Painganga Society Buldhana यावेळी धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत पुढील काळात शेतकरी व सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास नपा गटनेते मृत्युंजय गायकवाड,शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, तालुकाप्रमुख धनंजय बारोटे, अर्जुन दांडगे, जिजाऊ पतसंस्था उपाध्यक्ष शिवाजी तायडे,चौथा सरपंच गजानन गायकवाड, उपतालुकाप्रमुख हरिदास रिंढे, खरेदी-विक्री सेवा संघ संचालक ज्ञानेश्वर पवार, दलित मित्र भुजंगराव रिंढे,प्रा. अनिल रिंढे,विभाग प्रमुख विठ्ठल देवकर,शरद ताठे,ज्ञानेश्वर खांडवे यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.