मधुकर खोडे महाराजांना ‘प्रबोधनकार पुरस्कार’ जाहीर

    दिनांक :13-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Prabodhankar Award विदर्भासह ग्रामीण भागात व्यसनमुक्तीचे कार्य करत समाजप्रबोधन करणारे ‘व्यसनमुक्ती सम्राट’ म्हणून ओळखले जाणारे मधुकर खोडे महाराज यांना २०२६ सालचा “प्रबोधनकार पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त १६ मे २०२६ रोजी नागपूर येथील सुरेश भट सभागृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
 
nagpur
 
मधुकर खोडे महाराज गेल्या अनेक वर्षांपासून गावखेड्यांमध्ये, बंजारा तांड्यांमध्ये, भटक्या व आदिवासी वस्त्यांमध्ये तसेच शहरातील कामगार वसाहतींमध्ये जाऊन व्यसनमुक्तीचा संदेश देत आहेत. Prabodhankar Award राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील विचारांवर आधारित संदेश देत त्यांनी अनेकांना दारू, तंबाखू आणि इतर व्यसनांपासून दूर केले आहे. त्यांच्या प्रभावी वाणीमुळे अनेकांचे जीवन बदलले असून अनेक कुटुंबांना नवसंजीवनी मिळाली आहे.
 
खोडे महाराज आपल्या प्रवचनातून समाजातील राग, लोभ, द्वेष यांसारख्या नकारात्मक प्रवृत्ती दूर करण्याचेही मार्गदर्शन करतात. संत गाडगेबाबांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या कार्यात दिसून येतो. व्यसनमुक्तीसाठी ते प्रतीकात्मक ‘झोळी’ घेऊन लोकांना वाईट सवयी त्यागण्याचे आवाहन करतात. Prabodhankar Award या पुरस्काराची घोषणा पंकजपाल राठोड (सप्तखंजेरी वादक) आणि राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारेचे अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक यांनी केली. या घोषणेच्या प्रसंगी उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले होते. मधुकर खोडे महाराज यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा सन्मान दिला जात असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सौजन्य: ज्ञानेश्वर रक्षक, संपर्क मित्र