वर्धा,
presidents visit राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १६ एप्रिल रोजी वर्धेच्या दौर्यावर येत आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. राष्ट्रपती मुर्मू या सेवाग्राम येथील गांधी आश्रमातही जाणार असल्याने सेवाग्राम येथील मेडिकल चौकातील अतिक्रमण सोमवारी हटविण्यात आले.
सोमवार १३ रोजी प्रशासनाने सेवाग्राम येथील मेडिकल चौकातील अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली. या मोहिमेदरम्यान जेसीबीच्या सहाय्याने लहान व्यावसायिकांची दुकाने हटविण्यात आली. त्या सेवाग्राम येथील आश्रमाला भेट देणार आहे. व्हीव्हीआयपीच्या या दौर्याच्या पृष्ठभूमीवर प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेसह इतर तयारी गांभीर्याने सुरू केली आहे. पोलिस विभागाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.presidents visit राष्ट्रपती ज्या मार्गाने जाणार त्या मार्गावर कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. याच अनुषंगाने सेवाग्राम परिसरातील मेडिकल चौकातील अतिक्रमण सोमवारी पूर्वसूचना दिल्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आले.