देसाईगंज,
ridan patel देसाईगंज येथील कारमेल अकादमीचा विद्यार्थी रिदान मकसुद पटेल या विद्यार्थ्याने 1 तास 26 मिनिटे 26 सेकंद नॉन स्टॉप स्केटिंग करीत स्केटींग प्रतियोगित गिनिज बूक नोंदीचा विक्रम रचला.
कार्मेल अकादमीचे कोच रेशमा विश्वास निरंकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने हे यश संपादन केले. 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवात अनेक शहरांमध्ये एकाच वेळी रोलर स्केटींग हे प्रदर्शन करण्यात आले. यात भरतभरातून 520 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये रिदान याने 1 तास 26 मिनिटे आणि 26 सेकंद स्केटिंग करून आपले कौशल्य दाखवले. या समक्रमित कामगिरीने केवळ एकताच साजरी केली नाही तर राज्याच्या क्रीडा यशात एक चमकदार अध्याय जोडला आणि या आनंददायी प्रसंगावर एक अढळ छाप सोडली
.
रिदानने एशियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद केल्याने एशियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अविनाश डी. सुकुंदे यांच्या स्वाक्षरीने त्याला प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.ridan patel या उत्तुंग कामगिरीबद्दल देसाईगंजच्या नगराध्यक्षा लता सुंदरकर, उपाध्यक्ष नरेश विट्ठलानी, नगरसेवक राजु जेठानी, राजु रासेकर, उद्योजक अमित कुकरेजा, कल्पेश भैय्या, भास्कर डांगे, हाजि बबना कुरेशी, इंजि. नसिम पठाण, मोहसिन शेख तसेच शालेय शिक्षक, विद्यार्थ्यांनी रिदान मकसुद पटेल याचे अभिनंदन केले.