मुलींच्या लैंगिक शोषणाने परतवाडा हादरले

जाळ्यात ओढून ३५० व्हिडिओ व्हायरल खासदार अनिल बोंडे यांची तक्रार

    दिनांक :13-Apr-2026
Total Views |
अमरावती
Sexual abuse Parthwada परतवाडा शहरातील मोहम्मद अयान मोहम्मद तनवीर व मोहम्मद जोहान या युवकांनी अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार केल्याचे आणि ३५० पेक्षाजास्त अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचे धक्कादायक प्रकरण खासदार डॉ. अनिल बोंडे व भाजपा प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी उघडकीस आणले आहे. सोमवारी जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सविस्तर लेखी तक्रार व पेन ड्राईव्हमध्ये फोटो व व्हिडिओ देण्यात आले आहे.
 
amaravati 
Sexual abuse Parthwada  खा. बोंडे यांनी तक्रारीत नमुद केले की, अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उर्दू भाषेत व्हॉट्सअ‍ॅप व स्नॅपचॅट ग्रुप तयार केले जात आहेत. या ग्रुपमध्ये शिक्षण घेणार्‍या मुला-मुलींना शिक्षणाच्या नावाखाली समाविष्ट केले जाते. त्यानंतर त्यांचे नंबर काही मुस्लीम तरुणांना दिले जातात. हे तरुण संपर्क साधून मैत्री करतात, सुरुवातीला सामान्य गप्पा करतात आणि नंतर अश्लील लिंक, व्हिडिओ व मॅसेज पाठवून ब्लॅकमेलिंगचे जाळे विणतात. ग्रुप चालवणारे लोक मुलांना अश्लील व्हिडिओ पाठवतात, लिंक व मुलींचे नंबर शेअर करतात. मोबाईलवर अश्लील व्हिडिओ सेंड करून सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे. तक्रारीत परतवाड्यातील मोहम्मद अयान याने ९० हून अधिक मुलींना आपल्या जाळ्यात ओढले. त्याने त्यांच्यासोबत मुंबई, पुणे येथे जाऊन ३५० पेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ तयार करून ते व्हायरल केले. वेश्याव्यवसायात ढकलण्यासाठी मुलींना धमकावले. व्हिडिओ व्हायरल करण्याची व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे नमुद आहे.
पोलिसांवर संताप, आरोपी फरार
Sexual abuse Parthwada  खासदार बोंडे यांनी पोलिसांच्या निष्क्रियतेवर तीव्र संताप व्यक्त केला. तीन दिवसांपासून व्हिडिओ व्हायरल होत असताना परतवाडा पोलिसांनी सुमोटो कारवाई का केली नाही? असा थेट सवाल त्यांनी एसपींना केला. आरोपी कुटुंबासह परतवाड्यातून फरार झाल्याचेही त्यांनी सांगितले. सदर प्रकरणाच्या चौकशीसाठी तातडीने एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी करून त्यांनी मुख्यमंत्र्यांना घटनेची माहिती दिल्याचे सांगितले.
कारवाई नाही तर बुधवारी आंदोलन
Sexual abuse Parthwada  खासदार बोंडे स्पष्ट इशारा देताना म्हणाले, गुन्हे दाखल होऊन आरोपींना अटक न झाल्यास बुधवारी एसपी कार्यालयासमोर आंदोलन छेडले जाईल. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. जाळ्यात अडकलेल्या मुलींचे आयुष्य सुरक्षित करणे ही प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले. महापौर श्रीचंद तेजवानी, भाजप प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, भाजपा गटनेता चेतन गावंडे, नेहा वाजपेयी, अभय वाजपेयी, नगरसेवक आशिष अतकरे, प्रदीप हिवसे, प्रा. संजय तिरथकर, ऋषिकेश देशमुख, नगरसेविका राधा कुरील, लता देशमुख, नुतन भुजाडे, सुरेखा लुंगारे, स्वाती कुळकर्णी, विक्की शर्मा उपस्थित होते.