भाजपा महिला जिल्हा आघाडीतर्फे स्वाक्षरी मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

    दिनांक :13-Apr-2026
Total Views |
गडचिरोली,
signature campaign by bjp womens लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांसाठी 33 टक्के आरक्षण लागू करण्याच्या निर्णयाचे स्वागत करीत या विधेयकाला समर्थन देण्याकरिता भारतीय जनता पार्टी महिला आघाडी गडचिरोलीच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देण्याकरिता शहरातील इंदिरा गांधी चौक येथे 12 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता भव्य स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. गडचिरोली शहरातील सर्व महिला भगिनींनी व सर्व नागरिकांनी या स्वाक्षरी मोहिमेमध्ये सहभाग घेतला व पंतप्रधान यांना धन्यवाद दिले.
 
 
भाजपा महिला जिल्हा आघाडीतर्फे स्वाक्षरी
 
 
याप्रसंगी आमदार तथा गडचिरोली जिल्ह्याचे प्रभारी परिणय फुके, माजी आमदार तथा आदिवासी प्रदेश अध्यक्ष डॉ. देवराव होळी, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, नगराध्यक्ष अ‍ॅड. प्रणोती सागर निंबोरकर तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
नारीशक्ती वंदन विधेयक हे भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानले जात आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महिलांच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीला या विधेयकामुळे न्याय मिळाला आहे.signature campaign by bjp womens या निर्णयामुळे महिलांना निर्णयप्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याची संधी मिळणार असून त्यांच्या नेतृत्वगुणांना चालना मिळणार आहे. या विधेयकामुळे खरोखरच महिलांना खरा सन्मान मिळाला आहे.