नागपूर,
womens cricket tournament काटोल येथे आयोजित महिला टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात पार पडले तसेच समारोपप्रसंगी बक्षीस वितरण करून सर्व खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले. या स्पर्धेत पोलीस वाईफ चॅलेंजर्स आणि नबिरा चॅलेंजर्स यांच्यातील सामना अत्यंत रंगतदार आणि प्रेरणादायी ठरला.
सामन्यात खेळाडूंनी जिद्द, चिकाटी आणि उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. महिलांनी पूर्ण ताकदीने खेळ करत स्पर्धेला वेगळी उंची दिली. womens cricket tournament अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे महिला खेळाडूंना आपली क्षमता सिद्ध करण्याची उत्तम संधी मिळत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. स्पर्धेचे नियोजन अत्यंत उत्तमरीत्या पार पडल्याबद्दल आयोजकांचे कौतुक करण्यात आले तसेच पुढील काळातही अशा स्पर्धांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
सौजन्य: महादेव तायवाडे, संपर्क मित्र