अमरावती
teachers become BLOs एप्रिलमध्ये विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा होत असताना जिल्हा परिषदेच्या शाळेतील बीएलओ असलेल्या शिक्षकांना ऐन परीक्षेच्या काळात मतदार याद्या पुनर्निरीक्षणचे (एसआयआर) काम लागल्याने शेकडो शिक्षक बीएलओ कामासाठी नियुक्त केले आहेत.
teachers become BLOs सध्या एप्रिल महिना परीक्षा तसेच वर्षभरातील कामाचा विद्यार्थ्यांचा लेखाजोखा मांडण्याचा महत्त्वाचा काळ असताना शिक्षकांना बीएलओ म्हणून नियुक्त करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा, दैनंदिन अध्यापन व दैनंदिन कामे, दाखलपात्र याद्या, निकालपत्रक आदी कामे कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एप्रिल महिन्यात प्रत्येक शाळांमध्ये ऐन परीक्षेच्या काळात पटपडताळणी होणार आहे. त्यामुळे मतदारयाद्यांच्या कामासह गैरहजर विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी शिक्षकांना दारोदारी फिरावे लागत आहे. शालेय कामाशिवाय इतर शाळाबाह्य कामांच्या अतिरिक्त बोजामुळे शिक्षक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत.
teachers become BLOs बीएलओ व इतर अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षक बीएलओ कामात व्यस्त असल्याने शालेय नियोजन कोलमडले असून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर त्याचा विपरित परीणाम झाला आहे. त्यामुळे विद्यार्थाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न पालक विचारत आहे. तसेच येत्या भर उन्हात ४ थी व ७ वीची शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. सध्या ११ एप्रिलपासून १ ते ९ वर्गाच्या वार्षिक परीक्षा सुरू आहे.त्यात शिक्षकाकडे बीएलओचे काम आल्यामुळे ते त्रस्त झाले आहे.
teachers become BLOs मतदार यादीतील नावांची जुळवणी म्हणजेच मॅपिंग २००२ च्या मतदार यादीतील नातेवाइकांच्या नावाशी जुळवणे, मॅपिंग करणे हे अतिशय किचकट, वेळखाऊ काम आहे. अनेक आदिवासी, अशिक्षित मतदारांना माहिती सांगता येत नसल्याने मॅपिंगची टक्केवारीत वाढ होत नसल्याचे चित्र आहे. ऐन परीक्षाकाळात शाळेचे कामकाज न करता मतदारयाद्यांचे काम करण्यासाठी शिक्षकांना पूर्ण वेळ द्यावा लागत आहे.