सेलू,
temple of sant gajanan maharaj ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात आणि भक्तीमय वातावरणात हिंगणी येथील सुभेदारवाडीत संत गजानन महाराज मंदिराची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे. रविवार १२ रोजी मंदिर उभारणीच्या पृष्ठभूमीवर जागेची महाशांती पूजा हिंगणी ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली.
या सोहळ्यासाठी हिंगणी आणि परिसरातील भाविकांनी पहाटेपासूनच सुभेदारवाडी परिसरात गर्दी केली होती. मंदिरासाठी नियोजित असलेल्या जागेवर विधिवत महापूजा करण्यात आली. महायज्ञ हिंगणीकरांच्या साक्षीने पूर्ण झाला असून, लवकरच मंदिराच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरूवात होणार आहे.
हिंगणी नगरीला गजानन महाराजांच्या वास्तव्याचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे तर भाविकांनी दिलेल्या माहितीनुसार गजानन महाराज हिंगणी येथील सुभेदारवाडीत वास्तव्यास होते. त्यांनी तत्कालीन सुभेदार गणेश यादव यांना आशीर्वाद दिला होता. श्री गजानन विजय ग्रंथाच्या २० व्या अध्यायातील ७५ वी ओवी या घटनेची साक्ष देते.temple of sant gajanan maharaj महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मंदिर साकारले जात असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सुभेदार वाडीतील हे प्रस्तावित मंदिर भती आणि श्रद्धेचे मोठे केंद्र ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यत केला आहे.