नागपूर,
addiction treatment आधुनिक जीवनशैलीमुळे मद्य, तंबाखू, गुटखा, ड्रग्स तसेच मोबाइल, स्क्रीन आणि ऑनलाईन गेमिंग यांसारख्या विविध व्यसनांचे प्रमाण वाढले असून त्याचा शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. व्यसन हे केवळ सवय नसून एक गंभीर विकार असल्याचे मत विश्वकुंभ आयुर्वेदचे डॉ. संतोष सुर्यकांत पुसदकर यांनी व्यक्त केले. त्यांच्या मते सततचा ताण, नैराश्य, चुकीचे सामाजिक वातावरण, झोपेचा अभाव आणि मानसिक रिक्तता यामुळे व्यसनाची सुरुवात होते. तसेच शरीरातील वात, पित्त, कफ या दोषांचे असंतुलन आणि मेंदूतील डोपामिन पातळीतील बदल यामुळेही व्यसन वाढते.

व्यसनामुळे यकृत, हृदय आणि पचनसंस्थेवर परिणाम होतो तसेच चिडचिड, एकाग्रतेचा अभाव, आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक समस्या निर्माण होतात. सवय लागलेल्या पदार्थाशिवाय अस्वस्थता, खोटे बोलणे, लपवून व्यसन करणे आणि मानसिक अस्थिरता ही प्रमुख लक्षणे दिसतात. addiction treatment डॉ. पुसदकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्तीसाठी आयुर्वेदिक उपचार पद्धतींचा वापर केला जात असून त्यामध्ये औषधी काढे, चूर्ण, शोधन उपचार आणि नैसर्गिक वनस्पती रस यांचा समावेश आहे. या उपचारांमुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यास मदत होते तसेच मानसिक ताण कमी होऊन मन स्थिर राहते. व्यसनमुक्ती ही केवळ सवय सोडण्याची प्रक्रिया नसून शरीर, मन आणि भावनांचे पुनरुज्जीवन आहे, असेही त्यांनी सांगितले. या शिबिरात डॉ. किरण रहांगडाले प्रमुख चिकित्सक होत्या. एकूण ५५ तरुणांनी उपचारासाठी सहभाग नोंदवला.
सौजन्य: निकिता लुटे, संपर्क मित्र