बुलडाणा
Sadbhavana Seva Samiti ज्यांची इंद्रिय सत्संगाकडे वळते ते भाग्यवान आहेत. मृत्यु निश्चित आहे पण तो सुलभ व्हावा यासाठी तयारी करावी लागेल त्यासाठी सत्संगाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन साध्वी सृष्टीलता यांनी लहाने ले आऊट मैदानात सदभावना सेवा समिती द्वारा आयोजित रामकथेमध्ये केले.
Sadbhavana Seva Samiti मनुष्याचे मन उर्ध्व अवस्थेत नेण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. अधोगतीकडे, वाईट गोष्टीकडे जाण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाही. सत्संगाद्वारे प्रयत्न करावे पंडीत सचिदानंद पुत्तदकर यांनी मुख्य यजमान दिपक वर्मा, किरण वर्मा, दैनिक यजमान नितीन जैस्वाल, नंदिनी जैस्वाल यांनी संकल्प सोडुन पुजन, माल्यार्पण, आरती करुन स्वागत केले. जैस्वाल महिला मंडळाकडे आजच्या दिवसाचे व्यवस्थापन होते. यामध्ये श्रीमती पद्मा जैस्वाल, ममता जैस्वाल, उषा जैस्वाल, नंदीन जैस्वाल, स्नेहा जैस्वाल, पुनम जैस्वाल, शितल जैस्वाल, निशा जैस्वाल, दिपीका जैस्वाल, अनिता जैस्वाल यांनी रांगोळी, व्यासपीठ स्वच्छता, सजावट व आरतीची तयारी केली. Sadbhavana Seva Samiti आरतीमध्ये मुख्य यजमान रतनलाल वर्मा, मधुकर गायके, वंदना गायके, दैनंदिन यजमान यांनी व माहेश्वरी मंडळ, माहेश्वरी विवाहमंच डॉ. पवन बजाज, महेंद्र झंवर, दिपक गट्टाणी, जयशंकर जैस्वाल, पुनम जैस्वाल, नंदिनी जैस्वाल यांनी व्यासपीठावर आरती केली.
Sadbhavana Seva Samiti महाराष्ट्रची स्वर सम्राज्ञी दिवंगत आशा भोसले यांचे दुखःद निधन झाल्यामुळे रामकथा मंडपात अंजली परांजपे यांनी भावपुर्ण श्रध्दांजली दिली. सर्व श्रोत्यांनी दोन मिनीटे मौन पाळुन श्रध्दांजली दिली. यावेळी साध्वी सृष्टीलताजी फार भावूक झाल्या कंठ दाटुन आला आणि आशा भोसले यांनी गायलेले जय रघुनंदन जय सियाराम हे भजन म्हणुन अश्रुपुरीत नेत्रांनी श्रध्दांजली वाहीली.