राज्यात पाेलिस अधिकाऱ्यांच्या पदाेन्नतीचे वारे !

- पाेलिस विभागात आनंदीआनंद

    दिनांक :13-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
promotion of police officers राज्यात सध्या पाेलिस अधिकाऱ्यांच्या पदाेन्नतीचे वारे वाहत असून गृहमंत्रालयाच्या या सकारात्मक निर्णयामुळे राज्यभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेकडाे पाेलिस अधिकाऱ्यांची पदाेन्नती रखडली हाेती. मात्र, आता पदाेन्नतीची प्रक्रिया सुरु झाल्यामुळे राज्य पाेलिस दलात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
 
 

राज्यात पाेलिस अधिकाऱ्यांच्या पदाेन्नतीचे वारे  
 
 
गेल्या काही महिन्यांपासून पाेलिस दलातील पाेलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांपासून राज्य पाेलिस सेवा (रापाेसे) दर्जाच्या पाेलिस अधिकाऱ्यांच्या पदाेन्नत्या रखडल्या हाेत्या. त्यामध्ये सर्वाधिक पाेलिस निरीक्षकांचा समावेश आहे. पदाेन्नत्या रखडल्यामुळे पाेलिस दलात नाराजीचा सूर हाेता. तसेच पदाेन्नतीची यादी लवकरच पडेल, या आशेने कनिष्ठ पदावर काम करताना पाहिजे तेवढे गांभीर्य राहत नव्हते. पदाेन्नती झाल्याने बदली हाेणार आणि पुन्हा नव्या शहरात बढतीच्या पदावर काम करावे लागणार, या आशेने अधिकारी कर्तव्य बजावत हाेते. मात्र, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्परता दाखवून राज्य पाेलिस दलातील पदाेन्नतीला हिरवा कंदील दाखवला. पदाेन्नतीस गृहमंत्रालयाकडून काेणतीही अडचण नसल्याचे दर्शविताच पदाेन्नत्याच्या हालचाली सुरु झाल्या. पाेलिस महासंचालक कार्यालय आणि आस्थापना विभागातील लिपिक वर्गांमध्ये याेग्य ताे समन्वय नसल्यामुळे पदाेन्नत्यांना उशिर हाेत हाेता. मात्र, गेल्या आठवड्यापासून राज्यात पुन्हा पदाेन्नत्याचे वारे वाहू लागले आहे. नुकताच राज्यातील 403 पाेलिस हवालदारांना थेट पाेलिस उपनिरीक्षक पदावर पदाेन्नती देण्यात आली. तसेच तब्बल 201 सहायक पाेलिस निरीक्षकांना पदाेन्नती देऊन पाेलिस निरीक्षक पदावर नियुक्ती देण्यात आली.promotion of police officers आता पाेलिस निरीक्षक आणि सहायक पाेलिस निरीक्षक दर्जाच्या पाेलिस अधिकाèयांच्या पदाेन्नतीची यादीसुद्धा लवकरच लागणार असल्याची माहिती मुंबईतील सूत्रांकडून मिळाली आहे.
...आता पाेलिस निरीक्षकांना पदाेन्नती
गेल्या 3 डिसेंबर राेजी राज्यातील 448 पाेलिस निरीक्षकांची सहायक पाेलिस आयुक्त, पाेलिस उपाधीक्षक पदावर पदाेन्नती देण्यासाठी यादी प्रकाशित करण्यात आली हाेती. पाेलिस निरीक्षकांना 15 डिसेंबरपर्यंत माहिती मागविण्यात आली हाेती. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून पाेलिस निरीक्षकांच्या पदाेन्नतीची यादी रखडली हाेती. मात्र, आता लवकरच एसीपी-डीवायएसपी पदावर पदाेन्नतीसाठी महसूल संवर्ग मागविण्यात येणार असल्याची माहिती समाेर आली आहे.
अनेक पाेलिस निरीक्षकांच्या नशिबी उपेक्षा
गेल्या डिसेंबर ते 12 एप्रिल या कालावधीत काही पाेलिस निरीक्षक सेवाजेष्ठतेनुसार आणि वयाेमानानुसार सेवानिवृत्त झाले.त्यांची नावे एसीपी-डीवायएसपी पदावर पदाेन्नतीच्या यादीत समाविष्ठ हाेती. मात्र, गेल्या तीन महिन्यांत पदाेन्नतीच्या हालचाली न झाल्यामुळे अनेक पाेलिस निरीक्षकांच्या नशिबी उपेक्षा आली. अनेक जणांवर पदाेन्नतीविनाच सेवानिवृत्तीची पाळी आली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या लवकरच !
राज्यातील वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु झाली आहे. दाेन वर्षांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या येत्या आठवड्यात हाेण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पाेलिस अधीक्षक, पाेलिस उपायुक्त ते पाेलिस आयुक्त दर्जाच्या पाेलिस अधिकाèयांचा बदलींमध्ये समावेश आहे.