विदर्भाचे सुपूत्र दत्ता मेघे यांना वर्धेत श्रद्धांजली

    दिनांक :13-Apr-2026
Total Views |
वर्धा,
datta meghe विदर्भाचे सुपूत्र, ज्येष्ठ समाजसेवक दत्ता मेघे यांच्या स्मरणार्थ स्थानिक स्वाध्याय मंदिरात सर्वपक्षीय, विविध सामाजिक संघटना व व्यापारी संघटनांच्या वतीने वर्धा सोशल फोरमने श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी पवनार आश्रमचे संचालक गौतम बजाज होते. याप्रसंगी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, ज्येष्ठ पत्रकार प्रवीण धोपटे, प्रशांत देशमुख, माजी खासदार रामदास तडस, माजी खासदार सुरेश वाघमारे, माकपचे यशवंत झाडे, रिपाइंचे विजय आगलावे, प्रजापती ब्रह्मकुमारीजच्या माधुरी दीदी, शालिग्राम टिबडीवाल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
विदर्भाचे सुपूत्र दत्ता मेघे यांना वर्धेत श्रद्धांजली
 
 
अध्यक्षीय भाषणात गौतम बजाज म्हणाले की, दत्ताजी मेघे यांनी कृतार्थ जीवन जगले असून त्यांच्या कार्यातून नवीन पिढीने प्रेरणा घ्यावी, असे ते म्हणाले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी वर्धा शहरात यथोचित स्मारक उभारावे, अशी भावना मान्यवरांनी व्यत केली. सभेची सुरुवात पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी दत्ता मेघे यांच्याशी असलेल्या आपल्या मैत्रीच्या आठवणी सांगून केली. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी दत्ता मेघे यांच्यासारखा अद्वितीय दानदाता आणि गरिबांचा खरा कैवारी पुन्हा होणे कठीण आहे, असे मत व्यत केले.datta meghe उपस्थितांनी त्यांच्याविषयी आपआपल्या भावना व्यत करून श्रद्धांजली वाहिली.
यशस्वीतेसाठी अविनाश सातव, रविंद्र टप्पे, राहुल अवथनकर, श्याम परसोडकर, राजू कोरडे, रविंद्र रोकडे, संजय इंगळे (तिगावकर), संजय मानमोडे, महेश मोकलकर, संजय गोयंका आदींचे विशेष सहकार्य लाभले. संचालन पल्लवी पुरोहित यांनी केले तर आभार अभ्युदय मेघे व मनीषा मेघे यांनी मानले.