नागपूर,
protection against leopards राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय जानराव ढोबळे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय भौतिकशास्त्र विभागातील डॉ. अमित रमेश बनसोड या संशोधकांनी मिळून बिबटपासून नागरिकांच्या सुरक्षेसाठी नावीन्यपूर्ण संशोधन करीत अॅल्युमिनियमचा पिंजरा निर्माण केला आहे.
पिंजरा जाळीदार असून डोक्यावर घट्ट बांधला जातो. पाठीवर उर्वरित भाग दोन परतीमध्ये असतो. त्यामध्ये आठ स्पीकर लागले असून पकडायला मजबूत स्टॅन्ड दिला आहे. बिबट येताना दिसताच किंवा अंगावर झडप मारेल त्याच क्षणाला पिंजरा दोन्ही हातांनी हूक ओढल्यानंतर संपूर्ण अंगाभोवताल येईल व त्यावरील स्पीकर सुरू होतील.
या पिंजऱ्यापासून कोणताही त्रास होत नसून स्पीकर घरूनच चार्ज करता येतो. आपले संरक्षण, ही विद्यापीठाच्या संशोधनाचे महत्त्व व मुख्य उद्देश आहे. विदर्भ व मराठवाडामध्ये सद्यस्थितीत बिबट धुमाकूळ असून त्यामुळे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, सामान्य नागरिक, मजूर या सर्वांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रत्येक व्यक्तीला आपले कार्य व्यवस्थित करता येत नसल्याची स्थिती आहे. मनामध्ये बिबटची धास्ती घट्ट बसली असून बिबट आपल्यावर कधी आक्रमण करेल व नुकसान पोहोचवेल याची भीती महाराष्ट्रातील अनेक भागात निर्माण झाली आहे.
डॉ. संजय ढोबळे व डॉ. अमित बनसोड यांनी सामाजिक जाणिवेतून वरील संशोधन केले, हे विशेष. या संशोधनाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाचे डिझाईन नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. या दोन्ही संशोधकाचे कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. दिया पानेकर यांनी अभिनंदन केले आहे.
काय होईल....
खालील भागातील हुक पकडून खाली बसल्यानंतर याच वेळेत स्पीकरमधून जोरात वेगवेगळे आवाज येतील. वाचवा-वाचवा, ढोलाचे आवाज, ओरडण्याचे आवाज एकाच वेळी ऐकू येतील.protection against leopards त्यामुळे बिबट घाबरून पळून जाईल. आजूबाजूचे नागरिक सतर्क होऊन मदतीसाठी पोहोचतील.