पगारवाढीविरोधात ग्रेटर नोएडात हिंसक आंदोलन

    दिनांक :13-Apr-2026
Total Views |
ग्रेटर नोएडा,
Violent agitation in Greater Noida उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा परिसरात पगारवाढीच्या मागणीसाठी एका कंपनीतील कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र स्वरूपात उफाळून आले असून परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली. फेज २ भागातील एका उद्योगसंस्थेबाहेर सुरू असलेल्या या आंदोलनाला हिंसक वळण लागले. संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी प्रथम पोलिसांच्या वाहनाची तोडफोड केली आणि त्यानंतर ते वाहन उलथवून टाकले.
 
 
Violent agitation in Greater Noida
 
आंदोलन सलग चौथ्या दिवशीही सुरूच असून कर्मचाऱ्यांचा रोष वाढत असल्याचे चित्र दिसून आले. मोठ्या संख्येने एकत्र जमलेल्या आंदोलकांनी परिसरातील इतर वाहनांनाही लक्ष्य केले. काही वाहनांना आग लावण्यात आली तर अनेक ठिकाणी मालमत्तेचे नुकसान करण्यात आले. याशिवाय दगडफेकीच्या घटनाही घडल्याने वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असून आंदोलन आटोक्यात आणण्यासाठी पोलीस आणि प्रशासन सतत हालचाली करत आहेत.