बस आता जायचं!

चार दिवसाआधी आशाताईंनी असे का म्हटले?

    दिनांक :13-Apr-2026
Total Views |
मुंबई,
Why did Ashatai say that 'आता ९३ आलं, आता जायचं!' असे म्हणत चार दिवसांपूर्वीच ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्याशी फोनवर झालेल्या संवादात गायिका आशा भोसले यांनी आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने भावना व्यक्त केल्या होत्या. आता प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे, असेही त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या. आपल्या अद्वितीय आवाजाने आणि अनेक दशकांच्या संगीतसाधनेने भारतीय संगीत परंपरेत अढळ स्थान निर्माण केलेल्या आशा भोसले यांचे रविवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाच्या बातमीने संगीतविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे.
 
 

asha  
गेल्या काही महिन्यांपासून त्या वयोमानाशी संबंधित आजारपणामुळे फारशा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसत नव्हत्या. त्यांच्या निधनानंतर काल संध्याकाळी त्यांचे पार्थिव लोअर परळ येथील निवासस्थानी आणण्यात आले होते. या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर आणि कलाकारांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. सुधीर गाडगीळ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, चार दिवसांपूर्वीच त्यांचा आशा भोसले यांच्याशी संवाद झाला होता. त्या वेळी त्यांनी त्यांच्या जुन्या मुलाखतींबद्दलही विचारणा केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, त्या रेकॉर्ड केलेल्या मुलाखती माझ्याकडे आहेत ना, त्या मला लवकर ऐकायला आणून देशील का? कारण आता प्रत्येक दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. आज सकाळी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन लोअर परळ येथील एका निवासी संकुलात ठेवण्यात येणार असून दुपारी चार वाजता दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीत क्षेत्रात एक युग संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.